हार्दिक पंड्या च्या Birthday Wish ट्विटवर झहीर खान ने दिले मजेदार प्रत्युत्तर, पहा Tweet

10 सेकंदाच्या या व्हिडिओसह पंड्याने झहीरची फिरकी घेतली. हार्दिकच्या या फिरकी घेणाऱ्या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देताना झहीरने त्याचे अभिनंदन करत ट्विट केले आणि त्याला त्याच्याच अंदाजात उत्तर दिले. 

झहीर खान, हार्दिक पंड्या (Photo Credit: Getty)

सोमवारी टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) याने आपला 41 वा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान, झहीरच्या अनेक चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या झहीरला टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने देखील वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. पंड्या सध्या लंडनमध्ये लोअर बॅकवरच्या शस्त्रक्रियेसाठी पोहचला होता. आणि आता सध्या तो रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. या दुखापतीतून सावरण्यासाठी हार्दिक आगाळे 4-5 महिने क्रिकेट खेळू शकणार नाही. या दरम्यान त्याने झहीरला एक व्हिडिओ पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (लंडनमध्ये हार्दिक पंड्या याच्या पाठीच्या दुखापतीवर झाली शस्त्रक्रिया, सोशल मीडियावर फोटो केला शेअर)

या व्हिडिओमध्ये झहीर हार्दिकला गोलंदाजी करत आहे आणि पंड्याने त्या चेंडूवर षटकार मारला. 10 सेकंदाच्या या व्हिडिओसह पंड्याने झहीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्याची फिरकी घेतली. हार्दिकच्या या फिरकी घेणाऱ्या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देताना झहीरने त्याचे अभिनंदन करत ट्विट केले आणि त्याला त्याच्याच अंदाजात उत्तर देत लिहिले की, "हा हा हा ... तुझ्या शुभेच्छासाठी धन्यवाद हार्दिक,माझी फलंदाजी तुमच्यासारखी कधीच होऊ शकत नाही पण, या मॅचमधील माझ्या पुढील चेंडू जितकाच चांगला माझा वाढदिवस चांगला होता."

दरम्यान, झहीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हार्दिकने जो व्हिडिओ शेअर केला तो झहीरच्या चाहत्यांना काही फारसा पसंद पडला नाही. आणि हार्दिकला गर्विष्ठ म्हणत ट्रोल केले. टीम इंडियासाठी 14 वर्षे क्रिकेट खेळणार्‍या झहीरने भारतासाठी एकूण 92 टेस्ट, 200 वनडे आणि 17 टी -20 सामने खेळले आहेत.आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याने 17, वनडे मध्ये  282 आणि टेस्टमध्ये 311 विकेट्स घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत हार्दिकने या दिग्गज खेळाडूला शुभेच्छा देण्याची ही पद्धत चाहत्यांना पसंत पडली नाही आणि त्यांनी या व्हिडिओवर पंड्याला योग्य प्रतिसाद दिला.