युजवेंद्र चहल याने ने सुचवले नवीन नियम, ICC ला बालपणीचा 'हा' मजेदार नियम लागू करण्याचा दिला प्रस्ताव

युजवेंद्र चहल म्हणतो की यामुळे फलंदाजांना फायदा होईल आणि गोलंदाजांना एखादे हत्यार गमवावे लागेल. चहलने केवळ गोलंदाजांची बाजूच मंडळी नाही, तर विनोदाने आयसीसीला नवा नियम सुचविला.

युजवेंद्र चहल (Photo Credit: Getty Images)

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आपल्या शानदार फिरकी गोलंदाजीसह आपल्या स्वभावामुळेही चर्चेत राहतो. सामन्यानंतर सोशल मीडियावर त्याचा बहुचर्चित 'चहल टीव्ही' असो किंवा सहकारी खेळाडूंबरोबर मजा असो, हा खेळाडू मस्ती करण्यात कधीच मागे राहत नाही. सध्या कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लॉकडाउन चालू आहे आणि यावेळीही त्याची मजेदार शैली सुरू आहे. दुसरीकडे, आयसीसी (ICC) येत्या काही दिवसात कोरोना संसर्गाला सामोरे जाण्यासाठी लाळ लावून चेंडू चमकवण्यावर बंदी घालण्याचा विचार करीत असताना, चहलने आणखीन एक मजेदार नियम लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) चेंडूवर लाळ लावून चेंडूला पॉलिश करण्याच्या बाजूने नाही आणि कोरोनामुळे त्यावर बंदी घातली जाऊ शकते. चहल म्हणतो की यामुळे फलंदाजांना फायदा होईल आणि गोलंदाजांना एखादे हत्यार गमवावे लागेल. चहलने केवळ गोलंदाजांची बाजूच मंडळी नाही, तर विनोदाने आयसीसीला नवा नियम सुचविला. (Coronavirus Effect: क्रिकेट पुन्हा सुरु झाल्यावर बॉल टेंपरिंग कायदेशीर करण्यावर ICC करू शकते विचार, वाचा सविस्तर)

हा नियम असा आहे जो मुले बालपणात क्रिकेट खेळताना लागू करायचे. चहल स्पोर्ट्स तकशी बोलताना म्हणाला की, "बॉलवर लाळ न वापरल्याने स्विंगवर फरक पडेल. शेवटी, फक्त फलंदाजांना याचा फायदा होईल. म्हणूनच, आणखी एक नियम जोडला गेला पाहिजे की जर फलंदाजाने षटकार मारला तर तो स्वत: जाऊन स्टँडमधून चेंडू घेऊन येईल. तुम्ही प्रेक्षकांविना सामना आयोजित करण्याचा विचार करत असाल तर एक षटकार मारल्यानंतर चेंडू फलंदाजाला आणावा लागेल, जोवर फलंदाज चेंडू आणेल, तोवर आम्ही वाट पाहू.”

चहल नेहमी सहसा विनोदी मूडमध्ये असतो पण जेव्हा खेळाची वेळ येते तेव्हा तो मैदानावर तितकाच गंभीरही असतो. मर्यादित ओव्हरच्या खेळात चहलने भारताकडून महत्वाचे योगदान दिले आहे. दुसरीकडे, आगामी टी-20 वर्ल्ड कप प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत आयोजित करण्याचा सध्या विचार केला जात आहे. आणि चहलने त्याचा संदर्भात वरील विधान केले आहे. मात्र, सध्या स्थितीत टी-20 वर्ल्ड कपवर संकट बनलेले आहे.