Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Wedding: स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल अडकला विवाहबंधनात; धनश्री वर्माशी बांधली लग्नगाठ (See Photo)

सोशल मिडियावर सक्रीय असल्याने नेहमीच धनश्री तिचे डान्स व्हिडिओ चाह्त्यांसोबत शेअर करत असते. तिच्या व्हिडिओंना बरीच पसंती आणि कमेंट्सही मिळतात

Yuzvendra Chahal (Photo Credits: Instahram/Yuzvendra Chahal)

Yuzvendra Chahal-Dhanashree Verma Wedding: भारताचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) विवाहबंधनात अडकला आहे. त्याने मंगळवारी धनश्री वर्मासोबत (Dhanashree Verma) लग्नगाठ बांधली. चहलने इन्स्टाग्रामवर लग्नाचा फोटो शेअर करुन ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री यांनी यावर्षी 7 ऑगस्टला साखरपुडा केला होता. आता, आज गुरुग्राम येथे कोरियोग्राफर आणि यूट्यूबर असलेल्या धनश्री वर्माशी युजवेंद्रचे लग्न झाले. धनश्री आयपीएल 2020 मध्येही चहलसमवेत युएईमध्ये होती. सामन्यादरम्यान धनश्री अनेकदा चहलची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सपोर्ट करताना दिसली होती. चहल आणि धनश्रीच्या लग्नामुळे त्याचे चाहते खूप आनंदित आहेत आणि त्यांच्या लग्नाच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

लग्नाच्या फोटोमध्ये धनाश्री एका गडद लाल रंगाच्या लेहेंगामध्ये दिसली, तर चहल गडद लाल पगडी असलेल्या शेरवानीमध्ये दिसून आला. धनश्री एक डॉक्टर, कोरियोग्राफर आणि यूट्यूबर आहे. सोशल मिडियावर सक्रीय असल्याने नेहमीच धनश्री तिचे डान्स व्हिडिओ चाह्त्यांसोबत शेअर करत असते. तिच्या व्हिडिओंना बरीच पसंती आणि कमेंट्सही मिळतात. ती स्वत: ची नृत्य कंपनी ‘धनश्री वर्मा कंपनी’ चालवते. धनश्रीचे इन्स्टाग्रामवर पंचवीस लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. (हेही वाचा: Cricketer Rohit Sharma ने पत्नीच्या 33व्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर क्यूट फोटो शेअर करत केले Romantic पद्धतीने विश)

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23)

दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान लेगस्पिनर युजवेंद्र चहल एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत भारतीय संघाचा हिस्सा होता. चहलने अद्याप भारताकडून कसोटी सामन्यात प्रवेश केला नाही, परंतु तो वनडे आणि टी-20 संघांचा नियमित सदस्य आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध नुकत्याच खेळल्या गेलेल्या छोट्या फॉरमॅटमध्ये चहल काही खास कामगिरी करू शकला नाही. कसोटी मालिकेसाठी त्याचा समावेश नव्हता, त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरून तो परत भारतात आला. चहलने आतापर्यंत भारतासाठी 54 एकदिवसीय आणि 45 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. चहलने एकदिवसीय सामन्यात 92 आणि टी-20 मध्ये 59 विकेट्स घेतल्या आहेत.