Video: मनीष पांडे याच्या रिसेप्शनमधील युवराज सिंह याचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर हिट, नवीन जोडप्यासह केला धमाल

भारताचा सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक माजी खेळाडू युवराज सिंह आता जरी टीम इंडियासाठी क्रिकेट खेळत नसला तरीही चाहत्यांमध्ये त्याची क्रेज कमी झालेली नाही. युवीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. कर्नाटकचा फलंदाज मनीष पांडेच्या लग्नाच्या कार्यक्रमाशी निगडित एक व्हिडिओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

युवराज सिंह (Photo Credit: Instagram)

भारताचा (India) सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक माजी खेळाडू युवराज सिंह (Yuvraj Singh) आता जरी टीम इंडियासाठी क्रिकेट खेळत नसला तरीही चाहत्यांमध्ये त्याची क्रेज कमी झालेली नाही. कॅनडामध्ये खेळल्या गेलेल्या ग्लोबल टी-20 लीगमधील एक किंवा दोन शॉट्स असो किंवा अबू धाबी टी-10 लीगमधील छोट्या डावात लांब षटकार असोत, युवीचे व्हिडिओ सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची मनं जिंकत आहेत. आणि आता त्याचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. कर्नाटकचा फलंदाज मनीष पांडे (Manish Pandey) नुकताच विवाहबंधनात अडकला. त्याच्या लग्नाच्या कार्यक्रमाशी निगडित एक व्हिडिओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये युवराज धमाल करताना दिसत आहे. युवराज ढोलच्या तालावर जोरदार नाच करताना दिसत आहे आणि यावेळी मनीषही त्याच्यासह थिरकत आहे. (Video: महेंद्र सिंह धोनी याचा गाणे गातानाचा व्हिडिओ व्हायरल, 'चेतावणी: स्वतः च्या रिस्कवर पाहा हा')

मनीष पांडेच्या रिसेप्शन पार्टीमध्ये युवराजने जोरदार डान्स केला. तो स्वतः तर नाचलाच पण स्वतःसोबत मनीषलाही थिरकवले. युवराज ढोल ताशावर नाचताना दिसला. पांढरा कॅज्युअल शर्ट, डेनिम जीन्स आणि पांढरा शूज परिधान करुन युवराज मुंबईतील दि लीला हॉटेलच्या रिसेप्शन पार्टीत गेला होता. युवराजने नृत्यासह मनीष पांडे आणि आश्रिता शेट्टी (Ashrita Shetty) यांच्यासमवेत एक फोटोही घेतला आणि शेअरही केला. मनीषच्या लग्नात भारतीय संघातील इतर खेळाडू पोहोचू शकले नाहीत, परंतु सेकंड इनिंगसाठी सर्वांनी त्यांचे सोशल मीडियावरून अभिनंदन केले. पाहा युवराजचा डान्सिंग व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

Nice dance #yuvrajsingh and #manishpandey #ashritashetty with my team #dholibros Rocking 🤘🤘🤘 performance

A post shared by Vijay Bhatt (@vijaybhatt888) on

मनीषसाठी वेस्ट इंडिज मालिका खूप महत्वाची आहे. टी-20 विश्वचषकसाठी तो भारतीय संघात स्थान निश्चित करण्याच्या तो सध्या प्रयत्नात आहे. चौथ्या क्रमांकासाठी सध्या श्रेयस अय्यर याने मजबूत दावेदारी दर्शवली असली तरीही मनीषला मधल्या फळीत अन्य कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवल्यास तो मिळालेल्या संधीचे सोनं करेल यात शंका नाही. पांडेने कर्नाटकलानुकत्याच संपुष्टात आलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा विजेताही बनवले आहे. अंतिम सामन्यात पांडेने नाबाद अर्धशतक झळकावत आपल्या संघाचा विजय निश्चित केला. त्याच्या पत्नीबद्दल बोलले तर, 26 वर्षीय आश्रिता ही दक्षिण भारतीय चित्रपटांमधील एक अभिनेत्री आहे. तिने 2012 मध्ये तेलुगू चित्रपट 'तेलिकादा बोलली' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now