Yuvraj Singh Comeback: युवराज सिंह निवृत्ती मागे घेणार, पंजाबकडून स्थानिक क्रिकेट खेळण्यासाठी BCCI कडे मागितली रितसर परवानगी
आणि निवृत्तीनंतर अवघ्या 14 महिन्यांनंतर, अनुभवी खेळाडूने आपला निर्णय परत घेण्यास तयार आहे आणि पंजाबसाठी प्लेअर कम मेंटरची भूमिका निभावण्यासाठी तयार आहे.
2000 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंहने (Yuvraj Singh) गेल्या वर्षी जून महिन्यात सर्व प्रकारच्या खेळामधून निवृत्तीची घोषणा केली होती. आणि निवृत्तीनंतर अवघ्या 14 महिन्यांनंतर, अनुभवी खेळाडूने आपला निर्णय परत घेण्यास तयार आहे आणि पंजाबसाठी (Punjab) प्लेअर कम मेंटरची भूमिका निभावण्यासाठी तयार आहे. भारताने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात जिंकलेल्या 2011 वर्ल्ड कप (World Cup) स्पर्धेत 'मॅन ऑफ द टूर्नामेंट' कामगिरीमुळे युवराजची आजही आठवण केली जाते. युवराजला आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घ्यायचा आहे आणि त्यासाठी त्याने बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना पत्रही लिहिले आहे. गेल्या वर्षी 10 जून रोजी युवराजने क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती घेतली होती. क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत युवराजने खुलासा केला की, संघात अनेक अनुभवी आणि युवा खेळाडू असल्याने दुहेरी भूमिकेसाठी पंजाब क्रिकेट असोसिएशनचे (पीसीए) सचिव पुनीत बाली यांच्याकडे त्याने संपर्क साधला आहे. (‘तू किमान 'इतक्या' विकेट्स तरी घे’, जिमी अँडरसनच्या 600 टेस्ट विकेटनंतर युवराज सिंहचे जसप्रीत बुमराहला चॅलेंज)
युवराजने म्हटले, "पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी पुनीत बाली यांनी एका सत्रा नंतर माझ्याकडे संपर्क साधला आणि मला विचारले की मी सेवानिवृत्तीनंतर बाहेर येईन का?" युवीचे शुबमन गिल, अनमोलप्रीत सिंह, अभिषेक शर्मा आणि हरप्रीत ब्रार अशा पंजाबच्या अनेक युवा खेळाडूंशी उत्तम संबंध आहेत. या युवा खेळाडूंनी गेल्या महिन्यात युवीबरोबर काही प्रशिक्षण सत्रही केलं होतं. गिल आणि अन्य युवा खेळाडूंसह त्याने घालवलेल्या वेळेवर प्रकाश टाकत अष्टपैलू म्हणाला, “या तरुणांसमवेत वेळ घालवण्याचा आणि त्यांच्याशी खेळाच्या विविध बाबींविषयी बोलताना मला आनंद वाटला, मला कळले की मी त्यांना सांगत असलेल्या विविध गोष्टी उचलण्यास ते सक्षम आहेत. इतर काही घटक दाखविण्यासाठी मला नेटमध्ये उतरावे लागले आणि मी बऱ्याच काळापासून बॅट हातात घेतली नसतानाही मी चेंडू किती चांगला मारत होता यावर मला आश्चर्य वाटले."
युवराजने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले होते. यानंतर त्याने ग्लोबल टी-20 कॅनडा आणि अबू धाबी टी-10 लीगसह दोन परदेशी लीगमध्ये भाग घेतला. युवराजने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना निवृत्ती मागे घेण्यासाठी मेल पाठवला आणि स्पष्ट केले की जर पुन्हा पंजाबकडून खेळण्याची परवानगी दिली गेली तर तो देशाबाहेर खेळण्याचा विचार सोडून देईल.