अंबाती रायुडू याच्या निवृत्तीचं खरं कारण काय? योगराज सिंहा यांचा एम एस धोनी वर मोठा आरोप
योगराज म्हणाले, "धोनीसारखे लोकं कायमचे राहणार नाहीत. या सारखी घाण कायम राहणार नाही."
भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंघ (Yuvraj Singh) याचे वडिल योगराज सिंघ (Yograj Singh) हे अनेकवेळा वादात राहिले. आपल्या मुलाच्या निवृत्तीची घोषणा होताच योगराज यांनी माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) वर देखील वारंवार टीका केली. शिवाय त्यांनी धोनीची तुलना रावणाशी देखील केली होती. धोनीमुळेच युवराज टीमबाहेर गेला. धोनी युवराजला पसंत करायचा नाही, असे आरोप केले होते. आणि आता त्यांनी पुन्हा एकदा धोनीकडे टीकास्त्र सोडले आहे.
योगराज यांनी आपला मुलगा युवराजसह इतर भारतीय खेळाडूंचा करियर खराब केलं असे म्हटले आहे आणि आता अंबाती रायुडू (Ambati Rayudu) याच्या निवृत्तीसाठी जबाबदार मानले आहे. नुकतंच रायुडूने विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात स्थान न मिळाल्याने निराश होऊन क्रिकेटमधून निवुर्त्तीची घोषणा केली. रायुडूच्या निवृत्तीमागे धोनीला कारणीभूत मनात योगराज यांनी धोनीला घाण म्हणाले आहेत. योगराज म्हणाले, "रायुडू, तू निवृत्तीचा निर्णय घाईत केला आहेस. आपण सेवानिवृत्तीनंतर बाहेर यावे आणि आपण ते करण्यास सक्षम आहात हे दाखवावे. एम. एस धोनीसारखे लोकं कायमचे राहणार नाहीत. या सारखी घाण कायम राहणार नाही. येथे उल्लेख केला जाऊ शकतो की 2015 च्या विश्वचषकमध्ये रायुडू धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात होता. पण त्याला स्पर्धेत एकही सामना खेळायला मिळाला नाही."
दरम्यान, युवराज आणि त्याच्या वडिलांचे संबंध फारसे चांगले नव्हते. योगराज यांनी भारतासाठी 1 टेस्ट आणि 6 वनडे सामने खेळले आहेत.