Year-Ender 2021: क्रीडा क्षेत्रात ‘या’ भारतीय महिलांचा बोलबाला, ऑलिंपिक पोडियमपासून क्रिकेटच्या मैदानावर दाखवला दम
आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी आपल्या खेळाने देशाला आणखी उंचीवर नेले. आज आपण 2021 मध्ये लक्ष वेढी कामगिरी करणाऱ्या आघाडीच्या महिला खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. क्रिकेटचे मैदान असो किंवा ऑलम्पिक खेळ किंवा त्यांच्या संबंधित क्रीडा क्षेत्रातील मोठ्या स्पर्धा, या भारतीय महिलांनी संधीच सोनं केलं.
Year Ender 2021: यंदाचे वर्ष क्रीडा (Sports) क्षेत्रासाठी अनेक कारणांनी विशेष राहिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंनी आपल्या खेळाने देशाला आणखी उंचीवर नेले. क्रिकेटच्या (Cricket) मैदानाबाबत बोलायचे तर या वर्षी भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) आपले वर्चस्व कायम ठेवले. गेल्या 12 महिन्यांचे रिकॅप वर्षअखेर ही चांगली वेळ आहे. नवीन वर्षात शिकण्यासाठी चांगले, वाईट आणि कुरूप क्षण आपण प्रतिबिंबित करू शकतो. आज आपण 2021 मध्ये लक्ष वेढी कामगिरी करणाऱ्या आघाडीच्या महिला खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. पुरुष प्राधान्य खेळ विश्वात या महिलांनी देशाचा झेंडा आणखी उंच फडकावला. क्रिकेटचे मैदान असो किंवा ऑलम्पिक खेळ (Olympic Games) किंवा त्यांच्या संबंधित क्रीडा क्षेत्रातील मोठ्या स्पर्धा, या भारतीय महिलांनी संधीच सोनं केलं. (Year-Ender 2021: विराट कोहलीची ODI कर्णधार पदावरून हकालपट्टी ते टिम पेनचा ‘सेक्सटिंग’ विवाद, 2021 मध्ये ‘या’ वादांमुळे क्रिकेट विश्वाला बसला धक्का)
पीव्ही सिंधू (PV Sindhu)
ऑलिम्पिकमध्ये दुसरे पदक जिंकणाऱ्या सिंधूसाठी हे वर्ष संस्मरणीय ठरले आहे. तिला उपांत्य फेरीत Tai Tzu-ying कडून पराभव पत्करावा लागला आणि तिने He Bingjiao हिला पराभूत करून कांस्यपदक पटकावले. सिंधूनेही वर्षाची सुरुवात स्विस ओपनमध्ये रौप्यपदक जिंकून केली आणि अंतिम फेरीत कॅरोलिना मारिनचा पराभव केला.
राणी रामपाल (Rani Rampal)
रामपालच्या नेतृत्वात महिला हॉकी संघाने यंदा भरगोस यश मिळवले. रामपालच्या नेतृत्वात भारताने टोकियो स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहून ऑलिम्पिकमध्ये त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली पण महिला हॉकीमधील त्यांचे पहिले पदक थोडक्यात हुकले. रामपालच्या नेतृत्वात भारताच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे संघाचा कधीही हार न मानण्याची वृत्ती. रामपाल केवळ मैदानावरच नव्हे तर मैदानाबाहेरही एक आदर्श राहिली. भारताच्या पराभवानंतर जातीय अपशब्द वापरणाऱ्यांविरुद्ध ती सहकारी वंदना कटारियाच्या समर्थनार्थ बोलली.
शफाली वर्मा (Shafali Verma)
2019 मध्ये मर्यादित षटकमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या शेफालीने यंदा इंग्लंड दौऱ्यावर जबरदस्त कसोटी पदार्पण केले आणि प्रभाव निर्माण करण्यात वेळ वाया घालवला नाही. इंग्लंडने नऊ बाद 396 धावांवर घोषित केल्यानंतर फलंदाजी करताना वर्माने आपला नैसर्गिक खेळ केला. तिने पहिल्या डावात 152 चेंडूत 96 धावा केल्या, पण ती इथेच थांबली नाही. त्यानंतर तिने दुसरे अर्धशतक झळकावले आणि दुसऱ्या डावात 83 चेंडूत 63 धावा पूर्ण केल्या. वर्माने कसोटी पदार्पणात यश मिळविले आणि ते वर्षातील मुख्य आकर्षणांपैकी एक ठरले.
मीराबाई चानू (Mirabai Chanu)
चानूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. तिने एकूण 202 किलो वजन उचलले, ज्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. चानू रौप्य पदक जिंकणारी पहिली आणि ऑलिम्पिक पदक जिंकणारी कर्णम मल्लेश्वरी नंतर दुसरी भारतीय वेटलिफ्टर बनली.
अवनी लेखरा (Avani Lekhara)
अवनी लेखरा हिने यावर्षी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या R2 10 मीटर एअर रायफल SH3 फायनलमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले. पॅरा शुटर पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली. अवघ्या 19 व्या वर्षी लेखाराने अंतिम फेरीत 249.6 स्कोर करून नवीन पॅरालिम्पिक विक्रम प्रस्थापित केला. ती एवढ्यावरच थांबली नाही आणि R8 50m रायफल 3 पोझिशन्स SH1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकून अनेक पदकांसह मायदेशी परतली.
लवलिना बोरगोहेन (Lovlina Borgohain)
बोर्गोहेनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले आणि ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी ती फक्त तिसरा भारतीय बॉक्सर ठरली.
अदिती अशोक (Aditi Ashok)
टोकियो ऑलम्पिक खेळात असे काही खेळाडू होते ज्यांनी पदकाची संधी गमावली. पण आपल्या खेळाने त्यांनी सर्वांची मनं जिंकली आणि यामध्ये अदिती अशोक नक्कीच आघाडीवर असेल. 23 वर्षीय अदितीचे पदक मोक्याच्या क्षणी हुकल्याने तिच्यासह कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्याही निराशा झाली. ऑलिम्पिक हा क्रीडा जगतातील सर्वात मोठा टप्पा आहे आणि अदितीच्या प्रगतीनंतर भारतही दर्जेदार महिला गोल्फर तयार करू शकतात.