Year Ender 2020: वादविवाद! ‘या’ 5 घटनांमुळे यंदाचे वर्ष कोणीच विसरू शकणार नाही

दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रिकेटच्या मैदानावरील वादविवादाने खेळाला लाईमलाइटमध्ये कायम ठेवले. यंदा आपण 2020 मध्ये झालेल्या 5 मुख्य विवादांबद्दल जाणून घेणार आहोत.

विराट-अनुष्काबाबत सुनील गावस्कर यांची प्रतिक्रिया (Photo Credit: Wikimedia Commons)

Year-Ender 2020: पारंपारिकपणे ‘सज्जनांचा खेळ’ असे लेबल लावले असतानाही वादविवाद आणि क्रिकेट यांचा जवळचा संबंध आहे. आणि वाढती भागीदारी, अधिक दबाव, वाढीव कामाचा ताण व तीव्र मीडिया कव्हरेजमुळे खेळाडू वेळोवेळी आपल्यावरील ताबा गमावू लागत आहेत. कोरोना व्हायरसमुळे यंदा जास्त क्रिकेट खेळले गेले नाही परंतु काही मालिका टी-20 लीग खेळली गेली ज्यामुळे चुकीच्या कारणांमुळे क्रिकेटपटू चर्चेत राहिले. इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेने कोरोनानंतर पहिल्यांदा क्रिकेटर्स मैदानावर उतरले, तर आयपीएलद्वारे भारतीय खेळाडू देखील मैदानावर झळकले. आयपीएलची सुरुवातही मोठ्या वादाने झाली जेव्हा एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघातील तब्बल 13 सदस्य कोरोना पॉसिटीव्ह आढळले. नवीन वर्षाच्या आगमनाला अजून काही दिवस शिल्लक आहेत आणि जुने वर्ष म्हणजेच 2020 आपल्या अंतिम टप्प्यावर येऊन पोहचले आहेत. (Google Year in Search 2020: आयपीएल, UEFA Champions League, फ्रेंच ओपनसह यंदा भारतात गूगलवर 'या' खेळ स्पर्धांची रंगली चर्चा)

दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रिकेटच्या मैदानावरील वादविवादाने खेळाला लाईमलाइटमध्ये कायम ठेवले. यंदा आपण 2020 मध्ये झालेल्या 5 मुख्य विवादांबद्दल जाणून घेणार आहोत.

1. सुरेश रैनाची अखेरच्या क्षणी माघार

'मिस्टर आयपीएल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रैनाने आयपीएलसाठी कसून तैयारी केली. संघासोबत तो युएईमधेही दाखल झाला होता, पण अखेरचया क्षणी ‘वैयक्तिक कारणे’ असे सांगून स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. त्याला देण्यात आलेल्या खोलीबद्दल नाराजी असल्याच्या अनेक वृत्त समोर आले आणि त्यानंतर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष व सीएसकेचे मालक एन श्रीनिवासन यांनी अखेर मौन सोडले आणि एका मुलाखतीत नाराजी व्यक्त केली.

2. आयपीएलमध्ये शॉर्ट-रन

आयपीएलमधील सुरुवातीच्या मॅचमध्ये चुकीच्या अम्पायरिंग निर्णयाने स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष वेधले. दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यात 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या क्रिस जॉर्डनने दुसरी धाव घेण्यापूर्वी क्रीजच्या आत बॅट ठेवले नसल्याने  स्वेअर-लेग अंपायर नितीन मेमन यांना वाटले, ज्यामुळे पंजाबला एक धाव कमी मिळाली. पहिली धाव घेताना जॉर्डनने बॅट क्रिजच्या आत न ठेवल्याने धाव पूर्ण केली नाही असं त्यांचं मत होत. मात्र, टीव्ही रीप्लेमध्ये बॅटच्या क्रीजच्या आत स्पष्टपणे दिसत होती. यामुळे, पंजाब आणि दिल्लीमधील सामना टाय झाला व अखेरीस दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.

3. सुनील गावस्कर आणि विरुष्का वाद

यावर्षी आयपीएल दरम्यान माजी कर्णधार आणि भारतीय फलंदाज सुनील गावस्कर यांच्या आयपीएल दरम्यान एका वाटकव्याने मोठा वाद निर्माण झाला. आयपीएल सामन्यादरम्यान भाष्य करणाऱ्या गावस्कर यांनी विराट कोहलीवर झेल सोडल्याबद्दल टीका केली, पण काही लोकांनी याचा वेगळा अर्थच काढला. विराटची पत्नी अनुष्का शर्माने ट्विटरवर गावस्कर यांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया दिल्यावर प्रकरण आणखीनच ताणले गेले. गावस्कर यांनी अनुष्काच्या वक्तव्यानंतर स्पष्टीकरण दिले आणि म्हटले की माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे.

4. ऑस्ट्रेलिया दौर्यातून रोहित शर्माला वगळले

आयपीएलच्या दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट संघाचा मर्यादित षटकांचा उपकर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिकेमध्ये समावेश झाला नाही. बीसीसीआयने संघ जाहीर केल्यानंतर रोहितने आयपीएलमध्ये मुंबईकडून तीन सामने खेळले आणि फिट असल्याचा दिसला. या दरम्यान स्वत: रोहित म्हणाला की आपण पूर्णपणे तंदुरुस्त आहोत, पण रोहितच्या वक्तव्यानंतर बरेच वाद निर्माण झाले. या संपूर्ण प्रकरणात बीसीसीआय, क्रिकेटपटू आणि अगदी राष्ट्रीय प्रशिक्षक यांनाही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीबद्दलभिन्न मत दिले.

5. शाहिद आफ्रिदीचा रुद्र अवतार

पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटपटूला खेळण्याचा अफाट अनुभव आहे, परंतु नुकत्याच झालेल्या एलपीएल दरम्यान अफगाणिस्तानच्या एका वेगवान गोलंदाजावर रागाने प्रतिक्रिया व्यक्त केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तोही वादात सापडला. अफगाण गोलंदाज सामन्यादरम्यान मोहम्मद अमीरबरोबर शाब्दिक वादात अडकला. यामुळे आफ्रिदी चिडली होती आणि नंतर गोलंदाजीला त्याच्याच भाषेत समाज दिली ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला.

या वादविवादांव्यतिरिक्त, 2020 मध्ये आयपीएलमधील डीआरएससह अंपायर पॉल रेफलद्वारे आपला वाईड बॉलचा निर्णय बदलणे आणि टॉम कुरणला आऊट दिल्यावरही मैदानावर परत बोलावणे देखील चर्चेचा विषय ठरले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif