ICC Woman T20 World Cup 2024: बांगलादेशने स्कॉटलंडसमोर विजयासाठी ठेवलं 119 धावांचं आव्हान
या सामन्यात नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला आणि त्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने 20 षटकात 7 गडी गमवून 119 धावा केल्या आणि विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं आहे.
ICC Woman T20 World Cup 2024: वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा पहिल्या सामन्यापासून चर्चेचा विषय आली आहे. पहिला सामना बांग्लादेश आणि स्कॉटलंड यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशने 20 षटकात 7 गडी गमवून 119 धावा केल्या आणि विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं आहे. आता स्कॉटलंडचा संघ हे विजयी आव्हान पूर्ण करतं का? की, बांगलादेश स्कॉटलंड रोखतं? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. बांगलादेशकडून शाथी राणी आणि मुर्शिदा खातुन ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने सावध सुरुवात केलीय. 4.3 षठकात 26 धावा केल्या. पण नेमकी त्यावेळी मुर्शिदा खातुन बाद झाली आणि दबाव वाढला. पण साथी राणी आणि शोभना मोश्तरी यांनी डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. (हेही वाचा: Bangladesh vs Scotland ICC Womens T20 World Cup 2024 Live Streaming: महिला टी 20 विश्वचषकाच्या पहिल्या दिवशी बांगलादेश आणि स्कॉटलंड आमनेसामने; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल जाणून घ्या?)
शाथी राणी 29 धावांवर खेळत असताना कॅथरिन फ्रेझरने तिची विकेट काढली. त्यानंतर आलेली ताज नेहर काही खास करू शकली नाही. तिला आपलं खातही खोलता आलं नाही. एका बाजूने शोभना मोश्तरीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला. तिने 38 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 36 धावा केल्या आणि बाद झाली. कर्णधार निगर सुल्तानाने एका बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. पण तिला काही इतरांची साथ मिळाली नाही. शोमा अक्तर आणि रितू मोनी अवघ्या 5 धावा करून तंबूत परतले.
स्कॉटलंडकडून सस्किया हॉर्ले जबरदस्त गोलंदाजी केली. दोन षटकात 11 धावा देत 2 गडी बाद केले. कॅथरीन ब्राइसने 1, ऑलिव्हिया बेलने 1, सास्किया हॉर्लेने 3, तर कॅथरिन फ्रेझरने 1 गडी बाद केला. आता बांगलादेशच्या गोलंदाजांवर कमान असणार आहे. कारण 6 धावांच्या सरासरीने स्कॉटलंडला धावा करायच्या आहेत.