केन विल्यमसन आणि विराट कोहली (Photo Credit: IANS)

ICC World Test Championship Final 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल साऊथॅम्प्टन (Southampton) येथे 14-18 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात विजेतेपदाची लढत होणार आहे. अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी भारत आणि न्यूझीलंड या दोघांनी काही शानदार क्रिकेट खेळले. न्यूझीलंडने भारत, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तानसारख्या संघांना हरवून अंतिम फेरी गाठली. तर टीम इंडियाने किवी संघाविरुद्ध मालिका गमावल्यावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सारख्या धाकड संघांना पराभवाचे पाणी पाजले. विशेष म्हणजे भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यात असे काही खेळाडू दिसणार आहेत ज्यांनी 2008 मध्ये मलेशियामधील अंडर-19 वर्ल्ड कपमधून (U19 World Cup) एकत्र क्रिकेटचा प्रवास सुरू केला होता. आज 13 वर्षानंतर हे खेळाडू एक आपल्या संघांचे स्थापित क्रिकेटपटू बनले आहेत. (ICC WTC Final 2021: न्यूझीलंड कर्णधार Kane Williamson याची मागणी, भारताविरुद्ध फायनल सामन्यासाठी अशी हवी खेळपट्टी)

1. विराट कोहली (Virat Kohli)

2008 मध्ये कोहलीने कर्णधार म्हणून अंडर-19 वर्ल्ड कप विजेतेपदाचा मान मिळवला होता आणि आता त्याच्याकडे आयसीसीचे पहिले मोठे जेतेपद मिळवण्याची संधी आहे.आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा सामना अनेक प्रकारे 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल सामना आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या स्पर्धेत कोहलीने 877 धावा केल्या.

2. केन विल्यमसन (Kane Williamson)

कोहलीप्रमाणेच विल्यमसनने देखील 2008 च्या स्पर्धेत किवींचे नेतृत्व केले होते. तो किवीसाठी फॉर्मेटमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरला आणि शेवटी आंतरराष्ट्रीय कर्णधारही बनला. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम विजय कर्णधार म्हणून केनचा पहिला मोठा विजय असू शकतो. विल्यमसनने मोहिमेत तीन दुहेरी शतकांच्या जोरावर 817 धावा केल्या आहेत.

3. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)

2008 मध्ये एक जबरदस्त प्रतिभावान खेळाडू असलेला जडेजा सध्याच्या तीनही प्रकारातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक बनला आहे. कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार एमएस धोनी यांच्यासोबत 50 कसोटी, वनडे आणि टी-20 सामने खेळणारा तिसरा भारतीय खेळाडू आहे. ‘विराटसेने’ला अंतिम सामन्यात विजय मिळवून देण्यासाठी जडेजा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याने बॅटने 400 पेक्षा जास्त धावा केल्या आणि बॉलने 28 विकेट्स घेतल्या आहेत.

4. टिम साउदी (Tim Southee)

2008 अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत चर्चेत आलेल्या दोन वेगवान गोलंदाजींपैकी साऊदीचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने विराट कोहलीला अनेक वेळा सर्व फॉर्मेट्स पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. साऊथॅम्प्टनमधील सीमिंग आणि स्विंगिंग परिस्थितीमुळे साऊदी अंतिम सामन्यात किवी संघाचा मुख्य गोलंदाज असेल. शिवाय, त्याला ड्यूकची बॉल मिळणार आहे. साउदीने आतापर्यंत चॅम्पियनशिपमध्ये 51 विकेट्स घेतल्या आहेत.

5. ट्रेंट बोल्ट (Trent Boult)

बोल्ट या यादीत अखेरचा पाचवा खेळाडू आहे ज्याने 2008 अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. बोल्टने चॅम्पियनशिपमध्ये आजवर 34 विकेट्स घेत साउदीसोबत भेदक गोलंदाजी केली. दोंघांनी एकूण 85 विकेट्स घेतल्या.

हे पाचही खेळाडू साऊथॅम्प्टनमध्ये बहुप्रतिक्षित जागतिक कसोटी चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात आमनेसामने येतील आणि कसोटी खेळणार्‍या देशांमध्ये सर्वोत्कृष्ट असल्याची ख्याती मिळवतील.