World Test Championship: जसप्रीत बुमराह नव्हे तर WTC फायनल सामन्यात विराट ‘या’ भिडूला देऊ शकतो गोलंदाजीची धुरा, बनू शकतो ‘बूम-बूम’चा सर्वोत्तम पर्याय!
अशा परिस्थितीत कर्णधार विराट कोहली ही जबाबदारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पठ्ठा मोहम्मद सिराजला देऊ शकतो. इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर मोहम्मद सिराज अधिक घातक गोलंदाज ठरू शकतो. सिराजकडे स्विंग तसेच वेग आहे. चेंडू जुना झाल्यावर त्याला स्विंग करण्याची क्षमता देखील सिराजकडे आहे.
World Test Championship: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) एक स्टार खेळाडू म्हणून चर्चेत आला. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांच्या अनुपस्थितीत त्याने गोलंदाजी हल्ल्याचे नेतृत्व केले आणि भारतासाठी ऐतिहासिक विजय नोंदवण्यास मोलाची भूमिका बजावली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यातही फलंदाजांना बाद करण्याची पद्धत अशीच आहे असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजी (Laxmipathy Balaji) यांनी व्यक्त केले. बालाजीने म्हटले की वेगवान गोलंदाजांनी ठरवलेल्या एलिट मानदंडांचा विचार करून बुमराहचा बदली गोलंदाज मिळणे शक्य नसले तरी, सिराज मात्र बुमराहच्या जवळपास एकसारखीच बदली आहे. (World Test Championship 2021: न्यूझीलंड गोलंदाजांना टीम इंडियाच्या ‘या’ नवख्या खेळाडूची धास्ती, किवी प्रशिक्षकाचे हे विधान आहे पुरावा)
बुमराह सुरुवातीला सातत्याने त्याच्या भूमिकेत सर्वोत्कृष्ट काम करत होता, परंतु 2019 मध्ये त्याला स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्यापासून तो सतत कसोटी संघात सहभागी होऊ शकलेला नाही. यानंतर त्याला बर्याचदा दुखापतीचा त्रास सहन केला आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात बुमराह संघाचा महत्त्वाचा खेळाडू मानला जात आहे, परंतु त्याच्या अडचणीमुळे त्याला आता आघाडीच्या गोलंदाजाची जबाबदारी मिळणे फारच कमी दिसत आहे. अशा परिस्थितीत कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ही जबाबदारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) पठ्ठा सिराजला देऊ शकतो. इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर मोहम्मद सिराज अधिक घातक गोलंदाज ठरू शकतो. सिराजकडे स्विंग तसेच वेग आहे. शिवाय, चेंडू जुना झाल्यावर त्याला स्विंग करण्याची क्षमता देखील सिराजकडे आहे.
दुसरीकडे, यंदा स्थगित झालेल्या आयपीएलमध्ये देखील बुमराहला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. बुमराहने चेन्नई सुपर किंग्स विरोधात झालेल्या सामन्यात आयपीएल करिअर मधील सर्वात खराब गोलंदाजी करत चार ओव्हरमध्ये 56 धावा लुटल्या. या उलट आरसीबी कर्णधार कोहलीला गरज असताना सिराजने विकेट घेत विरोधी संघावर दबाव आणला आहे. शिवाय, सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शानदार कामगिरी केली होती अशा परिस्थितीत सिराजला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंड कसोटी मालिकेत संधी मिळाली तर तो विरोधी फलंदाजांना मोठा त्रासदायक ठरू शकतो.