Women’s T20 World Cup 2020: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियाची विजयी सलामी

सिडनी येथे झालेल्या महिलांच्या टी 20 वर्ल्ड कप 2020 मध्ये आज (21 फेब्रुवारी) पूनम यादवच्या शानदार बॉलिंगच्या जोरावर भारताने पहिल्याच सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघावर 17 धावांनी विजय मिळवला आहे.

Poonam Yadav (Photo Credits: Getty Images)

ICC Women’s T20 World Cup 2020:  सिडनी येथे झालेल्या महिलांच्या टी 20 वर्ल्ड कप 2020 मध्ये आज (21 फेब्रुवारी) पूनम यादवच्या शानदार बॉलिंगच्या जोरावर भारताने पहिल्याच सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघावर 17 धावांनी विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारता संघाने 20 षटकांमध्ये 132 धावा केल्या. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 49 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ 20 ओवर मध्ये 115 धावांवर ऑल आऊट झाली. (Women's T20 World Cup 2020 Schedule: आयसीसी टी-20 विश्वचषक 2020 चे भारतीय महिला टीमचं शेड्यूल, सामने कधी आणि कुठे होणार जाणून घ्या)  

भारतीय टीमने 20 ओव्हर्समध्ये चार विकेट्स गमवत 132 धावा बनवल्या. भारताला ही धावसंख्या बनवण्यात दीप्ती शर्माने शेवटच्या ओवरमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. दीप्ती अवघ्या 1 रने अर्धशतकापासून दूर राहिली. दीप्तीने 46 बॉल्समध्ये 3 चौकार ठोकत 49 धावा बनवल्या. तर  शेफाली वर्माला 29 धावांवर, स्मृती मानधना 10 धावांवर बाद  झाली. आजपासून सुरू झालेल्या टी 20 वर्ल्ड कपच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. दरम्यान दर दोन वर्षांनी होणार्‍या या वर्ल्ड कपच्या स्पर्धा 21 फेब्रुवारी ते 8मार्च दरम्यान होणार आहेत. यामध्ये जगभरातील 10 संघांचा समावेश आहे.

ग्रुप ए मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि थायलंड टीम आहेत. वर्ल्ड कपचे सारे सामने सिडनी, कॅनबरा, मेलबर्न आणि पर्थ येथे होणार आहेत.