Will Rohit Sharma Play Second Test? : एडिलेडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार? हिटमॅनवर सर्वांच्या नजरा

अॅडलेड येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा सामिल झाला आहे. त्यामुळे पहिल्या कसोटील्या हिटमॅनवर सर्वांच्या नजरा आहेत.

Photo Credit- X

Will Rohit Sharma Play Second Test? : टीम इंडीया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील (Border-Gavaskar Trophy) दुसरा कसोटी सामना ॲडलेडवर 6 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. डे-नाईट पिंक बॉलने कसोटी खेळवली जाईल. पहिली कसोटी भारताने 295 धावांनी जिंकली होती. भारताने पहिली कसोटी रोहित शर्मा (Rohit Sharma) शिवाय जिंकली होती. मात्र, आता तो पुन्हा संघात सामिल झाला आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीला मुकल्याने सर्वांच्या नजरा हिटमॅनवर असणार आहेत. (Rohit Sharma Stats In Pink Ball Test: पिंक बाॅल कसोटीत रोहित शर्माची कशी आहे कामगिरी? येथे वाचा 'हिटमॅन'ची आकडेवारी)

भारताने 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता एकीकडे दुसऱ्या कसोटी सामना जिंकण्याचा दबाव ऑस्ट्रेलियावर असला तरी दुसरीकडे पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाचे पारडे भारतापेक्षा जड आहे. त्याशिवाय एडिलेड येथील खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावेल. (Rohit Sharma Baby Boy Name: क्रिकेटर रोहित शर्मा- रितिका सजदेह यांच्या मुलाचं नाव 'अहान'; या क्यूट फोटोतून केलं जाहीर)

भारतीय संघ व्यवस्थापनाने रोहित शर्मा कोणत्या स्थानावर खेळणार याचे संकेतही दिले आहेत. रोहित शर्मा मधल्या फळीत खेळणार असल्याची शक्यता आहे. दुसऱ्यांदा बाबा झाल्याने रोहित शर्मा पहिल्या कसोटीतून बाहेर झाला होता. पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने 295 धावांनी शानदार विजय मिळवला होता. जैस्वाल-राहुलची जोडी जबरदस्त प्रभावी ठरली. या दोघांनी दुसऱ्या डावात पहिल्या विकेटसाठी सनसनाटी 201 धावांची भागीदारी केली ज्यामुळे भारताने 534 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.

दोन्ही संघांमध्ये ॲडलेड ओव्हल मैदानावर आतापर्यंत 85 कसोटी सामने झाले आहेत. ज्यात 41 वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघ विजय ठरला. तर 24 कसोटीत प्रथम गोलंदाजी करणारा संघ विजयी ठरला. टीम इंडियाने याआधी ऑस्ट्रेलियामध्ये सलग दोनदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे आणि आता सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif