IND vs BAN 1st T20I Weather Update: भारत-बांगलादेश पहिल्या टी-20 सामन्यात पाऊस ठरणार खलनायक? एका क्लिकवर वाचा हवामान रिपोर्ट
टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) खांद्यावर आहे. त्याचबरोबर नजमुल हुसेन शांतो (Najmul Hossain Shanto) बांगलादेशचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (IND vs BAN T20I Series 2024) पहिला सामना आज 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामनाग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. या मैदानावरील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल. 28 सप्टेंबर रोजी बीसीसीआयने बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) खांद्यावर आहे. त्याचबरोबर नजमुल हुसेन शांतो (Najmul Hossain Shanto) बांगलादेशचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
कसे असेल हवामना?
ग्वाल्हेरमध्ये नुकताच खूप पाऊस झाला होता. मात्र 6 ऑक्टोबर रोजी हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे. यासोबतच पावसाची अजिबात शक्यता नाही. सामन्याच्या दिवशी ग्वाल्हेरचे कमाल तापमान 34 अंश तर किमान तापमान 24 अंश असणार आहे. पावसाची शक्यता नगण्य आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना संपूर्ण 40 षटकांच्या सामन्याचा आनंद घेता येणार आहे. (हे देखील वाचा: India vs Bangladesh T20 Head To Head Record: बांगलादेश विरुद्ध टी 20 मध्ये भारतीय संघाचा असा आहे रेकॉर्ड; येथे हेड टू हेड आकडेवारी पाहा)
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रियान पराग, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
बांगलादेश : लिटन दास (विकेटकीपर), तनजीद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हृदोय, महमुदुल्ला, झेकर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब.