IND vs SL ODI Series 2024: श्रीलंकेविरुद्ध केएल राहुल आणि श्रेयस अय्यर संघात परतणार? एकदिवसीय मालिकेत अशी दिसू शकते टीम इंडिया
रिपोर्टनुसार, श्रेयस अय्यर (Shryas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमन करु शकतात.
IND vs SL ODI Series 2024: भारतीय क्रिकेट संघ या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर (India Tour Sri Lanka) जाणार आहे. टीम इंडिया श्रीलंकेत तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तेवढीच एकदिवसीय मालिका खेळणार आहे. गौतम गंभीरच्या कोचिंग करिअरची सुरुवात भारताच्या श्रीलंका दौऱ्यापासून होईल. पुढील आठवड्यात होणाऱ्या दोन्ही मालिकांसाठी गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची (Team India) निवड होणार आहे. रिपोर्टनुसार, श्रेयस अय्यर (Shryas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमन करु शकतात. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) देखील एकदिवसीय मालिकेचा भाग असू शकतात. बीसीसीआय सचिवांनी आधीच स्पष्ट केले आहे की 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार असेल.
या 15 खेळाडूंना वनडे मालिकेत मिळू शकते संधी
15 सदस्यीय संघात कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्या रूपाने तीन सलामीवीर असू शकतात. केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि रिंकू सिंग यांना मधल्या फळीत संधी मिळण्याची अपेक्षा आहे. ऋषभ पंत आणि केएल राहुल यांना यष्टिरक्षक म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. फिरकी विभागात कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा असू शकतात. तर वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आवेश खान आणि अर्शदीप सिंग असू शकतात. मात्र, विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना वनडे मालिकेत विश्रांती दिली जाण्याचीही शक्यता आहे.
हे देखील वाचा: Yashasvi Jaiswal New Record: यशस्वी जैस्वालने एका चेंडूवर केल्या 13 धावा, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील एकमेव फलंदाज
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा 15 सदस्यीय संभाव्य संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.
रोहित, विराट आणि बुमराह यांना विश्रांती मिळाल्यास 15 सदस्यीय संभाव्य संघ - शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, के. यादव, मोहम्मद सिराज, खलील अहमद, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.