Jay Shah पाकिस्तानाला जाणार का? Asia Cup 2023 च्या उद्घाटन समारंभासाठी PCB ने केले अमंत्रित

दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत झका अश्रफ यांनी जय शाह यांना तोंडी आमंत्रण पाठवले होते. यानंतर आता पाकिस्तान बोर्डाने औपचारिक निमंत्रण पत्रही पाठवले आहे.

Jay Shah (Photo Credit - Twitter)

यावेळी आशिया कपचे (Asia Cup 2023) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. 30 सप्टेंबर रोजी मुलतान येथे नेपाळ आणि पाकिस्तान (NEP vs PAK) यांच्यातील पहिला सामना होणार आहे. विशेष बाब म्हणजे आशिया चषकाच्या उद्घाटन समारंभासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बीसीसीआयचे (BCCI) सचिव आणि एसीसी (Asian Cricket Council) चे अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांना उद्घाटनाच्या सामन्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी जय शाह यांना निमंत्रण पाठवले आहे. दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत झका अश्रफ यांनी जय शाह यांना तोंडी आमंत्रण पाठवले होते. यानंतर आता पाकिस्तान बोर्डाने औपचारिक निमंत्रण पत्रही पाठवले आहे. पीसीबीचे म्हणणे आहे की जय शाह आशियाई क्रिकेट परिषदेशी संबंधित आहे, त्यामुळे मंडळांच्या प्रमुखांना सलामीच्या सामन्यासाठी आमंत्रित केले आहे.

शाह यांनी पाकिस्तानला जाण्याबाबत केले स्पष्ट

वशेष म्हणजे पीसीबीच्या निमंत्रणानंतर जय शाहने निमंत्रण स्वीकारल्याची चर्चा पाकिस्तानी मीडियामध्ये रंगली होती. मात्र बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. त्याच्याबद्दल जे काही बोलले जात आहे ते दिशाभूल करणारे आहे, असे ते म्हणतात. ही अफवा काही भंपक घटकांनी पसरवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला निमंत्रण देऊन हे दाखवायचे आहे की ते खेळाला राजकारणाशी जोडत नाही. (हे देखील वाचा:

भारत-पाक सामना होणार श्रीलंकेत

विशेष म्हणजे आशिया चषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने श्रीलंकेतील तटस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही. यावेळी आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तानचे संघ सहभागी होत आहेत.