IPL Auction 2025 Live

IND vs SA Weather Report: भारत-दक्षिण आफ्रिका मॅचमध्येही पाऊस पडणार? जाणून घ्या कसे असेल हवामान

शुक्रवारी मेलबर्नमध्ये खेळले जाणारे दोन्ही सामने पावसामुळे रद्द करण्यात आले.

IND vs SA (Photo Credit - Twitter)

टी-20 विश्वचषकात (T20 WC 2022) टीम इंडियाचा (Team India) पुढचा सामना रविवारी, 30 ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) होणार आहे. ऑस्ट्रेलियात सर्वत्र पाऊस पडत आहे, त्यामुळे या स्पर्धेतील आतापर्यंत 4 सामने रद्द करण्यात आले आहेत. शुक्रवारी मेलबर्नमध्ये खेळले जाणारे दोन्ही सामने पावसामुळे रद्द करण्यात आले. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा पुढचा सामना होणाऱ्या पर्थच्या हवामानामुळे क्रिकेट चाहते खूपच चिंतेत दिसत आहेत. पर्थमधील रविवारचे हवामान जाणून घेण्यापूर्वी, तुम्हाला सध्याची हवामान स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे.

सामन्यादरम्यान पाऊस पडेल का?

पर्थमध्ये संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. त्यावेळी भारतात संध्याकाळचे साडेचार वाजले असतील. Weather.com नुसार, रविवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून पर्थमध्ये पावसाची शक्यता नाही. रात्री नऊनंतर दोन टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान पर्थमधील तापमान 13 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. दोन्ही संघ कडाक्याच्या थंडीत सामने खेळतील. (हे देखील वाचा: IND vs SA: टीम इंडियाच्या नजरा विजयाच्या हॅट्ट्रिककडे, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजाचं असणार आव्हन)

Perth Weather (Accuweather.com)

पाऊस पडला तर?

सामन्यादरम्यान पाऊस पडल्यास प्रथम षटके कमी केली जातील. अंपायरला जास्तीत जास्त षटके टाकायची आहेत. किमान पाच षटकांचा सामना असू शकतो. पाच षटकांचा सामना होण्याची शक्यता नसल्यास सामना रद्द घोषित केला जाईल. आणि दोन्ही संघाना 1-1 गुण दिला जाईल.