ICC बाद फेरीतील सामन्यांमध्ये Team India का अपयशी ठरते? माजी भारतीय क्रिकेटपटूने उघडले रहस्य

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात विराट कोहली आणि संघ आता न्यूझीलंडला टक्कर देणार आहे. अशास्थितीत माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांनी गंभीर टप्प्यावर भारतीय संघाला 'चोकर' कशामुळे म्हणतात यावर प्रकाश टाकला.

रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

एमएस धोनीच्या नेतृत्वात आयसीसी (ICC) स्पर्धांमध्ये संघाच्या शानदार कामगिरीनंतर टीम इंडियासाठी (Team India) अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये बाद फेरी गाठणे कठीण झाले आहे. 2013 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर (ICC Champions Trophy) भारतीय संघ (Indian Team) आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकू शकला नाही आणि मोठ्या स्पर्धांमध्ये 'चोकर' टॅग देण्यास प्रवृत्त केले. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल (ICC World Test Championship Final)) सामन्यात विराट कोहली आणि संघ आता न्यूझीलंडला (New Zealand) टक्कर देणार आहे. अशास्थितीत माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता (Deep Dasgupta) यांनी गंभीर टप्प्यावर भारतीय संघाला 'चोकर' कशामुळे म्हणतात यावर प्रकाश टाकला. दासगुप्ताने स्पोर्ट टुडेला सांगितले की, ही वस्तुस्थिती अशी आहे की 7 वर्षाहून अधिक कालावधीत भारताने आयसीसीची कोणताही बाद फेरी जिंकलेली नाही. कदाचित जास्त विचार करणे संघाच्या पराभवाचे मुख्य कारण असेल. (टीम इंडियाचे ऑस्ट्रेलिया-इंग्लंडविरुद्धचे 2016-17 टेस्ट सामने फिक्स होते? वृत्तवाहिनीने केलेल्या मॅच फिक्सिंगच्या दाव्यावर ICC ची मोठी प्रतिक्रिया)

“चोकर टॅगबद्दल विचार करा, खरं म्हणजे 2013 पासून भारताने आयसीसी स्पर्धांमध्ये बाद फेरी जिंकलेली नाही. पुन्हा, आयसीसी स्पर्धेत मोठा खेळ असल्याने जास्त दबाव असणे आणि अधिक विचार करणे या गोष्टी व्यतिरिक्त कोणतेही खास कारण नाही,” चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना दासगुप्त म्हणाले. 2017 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि न्यूझीलंडविरुद्ध 2019 वर्ल्ड कप 'चोकर' बनण्याची ताजी उदाहरणे आहेत. हे दोन्ही सामने भारताने जिंकले पाहिजे होते असे दासगुप्ता यांना वाटते. "न्यूझीलंडविरुद्ध सामन्याबद्दलही विचार करा, मला वाटते की भारताने ते जिंकलेच पाहिजे होते. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी (फायनल) पाकिस्तानविरुद्ध, नो-बॉल, त्यात जाऊ नये. आपण त्या नो-बॉलबद्दल बरेच काही बोललो आहे. त्यानंतर वेस्ट इंडीज वानखेडे सामना (2016 टी-20 वर्ल्ड कप) नाणेफेकने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 180 (192) ही चांगली धावसंख्या नव्हती, परंतु दव घटक आणि त्या सर्व गोष्टीने मुख्य भूमिका बजावली,” दासगुप्ताने पुढे म्हटले.

कसोटी चँपियनशिप फायनल ही भारताची आयसीसीची पुढील मोठी स्पर्धा असल्याने दासगुप्ता यांना वाटते की विराट कोहली आणि रोहित शर्मा यासारख्या मोठ्या खेळाडूंवर जबाबदारी असेल आणि ही संधी गमावू नये व प्रथम कसोटी चॅम्पियनशिप ट्रॉफी घरी आणावी, अशी आशा दासगुप्ताने व्यक्त केली आहे. "आपण संख्या नाकारू शकत नाही. आयसीसी बाद फेरीत आपले सर्वोत्तम फलंदाज आणि गोलंदाज कामगिरी करावेत अशी आपली इच्छा असते. ते का नाही करू शकले याचे कोणतेही स्पष्ट कारण नाही. मला असेही वाटते की याबद्दल त्यांनी विचार करू नये. पण हो, वस्तुस्थिती अशी आहे की या बाद फेरीतील सामन्यांमध्ये त्यांना बऱ्याच धावा करता आलेल्या नाहीत.”



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Stumps: बुमराह-आकाशने केला चमत्कार, फॉलोऑनचा धोका टळला; चौथ्या दिवसाअखेर भारताच स्कोर 252/9

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना