Ricky Ponting On Border Gavaskar Trophy: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कोण जिंकणार, भारत की ऑस्ट्रेलिया? रिकी पाँटिंगने केली धक्कादायक भविष्यवाणी

2018 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. त्याचवेळी, 2020-21 मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कांगारूंच्या अभिमानाचा लोळवून काढला.

Ricky Ponting (Photo Credit - X)

Border Gavaskar Trophy 2024-25: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 22 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबाबत (Border Gavaskar Trophy) रिकी पाँटिंगने (Rincky Ponting) मोठी भविष्यवाणी केली आहे. रोहितची सेना पाच पैकी फक्त एकच सामना जिंकू शकेल असे पॉन्टिंग म्हणतो. कांगारूंच्या भूमीवर गेल्या दोन दौऱ्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरी अप्रतिम राहिली आहे. 2018 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. त्याचवेळी, 2020-21 मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कांगारूंच्या अभिमानाचा लोळवून काढला. आता काही दिवसावर होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीबाबत रिकी पाँटिंगने मोठे भाष्य केले आहे. (हे देखील वाचा: Border Gavaskar Trophy 2024: ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट-रोहितपेक्षा 'या' खेळाडूचे आकडे आहे खास, तरीही टीम इंडियात नाही स्थान)

पाँटिंगने केली धक्कादायक भविष्यवाणी

आयसीसीच्या रिव्ह्यू शोमध्ये बोलताना रिकी पाँटिंगने बॉर्डर-गावस्कर मालिकेबाबत भाकीत केले. तो म्हणाला, “मला वाटते की पाच सामन्यांपैकी टीम इंडिया फक्त एकच कसोटी जिंकण्यात यशस्वी होईल. माझ्या मते, ऑस्ट्रेलिया सध्या अधिक संतुलित, स्थिर आणि अनुभवी संघ आहे. यासोबतच ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत करणे किती कठीण आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अशा परिस्थितीत, माझ्या मते, मालिकेचा निकाल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने 3-1 असा होईल. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याचवेळी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला नुकतेच न्यूझीलंडकडून त्यांच्याच घरी 3-0 ने पराभव स्वीकारावा लागला.

शमीच्या अनुपस्थितीचा कांगारूंना होईल फायदा 

भारतीय संघात मोहम्मद शमीची अनुपस्थिती ही ऑस्ट्रेलियासाठी चांगली बातमी असल्याचे रिकी पाँटिंगचे मत आहे. पॉन्टिंगच्या मते, शमीच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची शक्यता आधीच कमी झाली आहे. एकदिवसीय विश्वचषकातील चमकदार कामगिरीनंतर शमीला क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करता आलेले नाही. घोट्याच्या दुखापतीमुळे भारतीय वेगवान गोलंदाजावरही शस्त्रक्रिया करावी लागली, त्यानंतर तो मैदानात परतण्याच्या तयारीत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी शमी पूर्णपणे तंदुरुस्त होऊन टीम इंडियात सामील होईल, असे मानले जात होते. मात्र, आता ताज्या वृत्तानुसार, रणजी संघात त्याची निवड न झाल्याने शमीला बॉर्डर-गावस्कर मालिकेत खेळणे जवळपास अशक्य झाले आहे.