IPL 2021: आयपीएलच्या पुढील हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाचे नेतृत्व कोण करणार? पाहा काय म्हणाले, सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन

आयपीएलच्या (IPL 2020) इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) संघ यावर्षी पहिल्यांदाच प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे.

CSK (Photo Credit: IPL)

आयपीएलच्या (IPL 2020) इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) संघ यावर्षी पहिल्यांदाच प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाचा आतापर्यंत आयपीएलमधील सर्वात संतुलित संघ असा लौकिक होता. परंतु, यावर्षी चेन्नईला लौकिकाला साजेसा खेळ करणे शक्य झाले नाही. यामुळे यंदाच्या हंगामात अनपेक्षित कामगिरी करणारा महेंद्र सिंह धोनी आयपीएलमधून निवत्त होणार? अशा चर्चांना उधाण आले आहे. यावर सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन (Kasi Viswanathan) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने आयपीएलचे 3 किताब जिंकले आहेत. याशिवाय चेन्नईचा संघ पहिल्यांदाच प्ले-ऑफमधून बाहेर पडला आहे. आमच्या संघाएवढे सातत्य आजपर्यंत इतर कोणत्याही संघाने दाखवलेले नाही. एका खराब वर्षामुळे आम्ही सरसकट बदल करायला हवा असे अजिबात वाटत नाही. महत्वाचे म्हणजे, आयपीएलच्या पुढील हंगामात धोनी नक्की खेळेल आणि तोच चेन्नईच्या संघाचा कर्णधारदेखील असेल, असे विश्वनाथन टीओआयशी बोलताना म्हणाले आहेत. तसेच स्पर्धेच्या आधी सीएसकेच्या गोठ्यात कोरोनाचा शिरकाव झाला. याचबरोबर सुरेश रैना, हरभजन सिंह या दोघांनी वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून माघार घेतली. ज्यामुळे संघाचे संतुलन बिघडले, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Harbhajan Singh Slams BCCI: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुर्यकुमार यादव याची निवड न केल्याने हरभजन सिंह याने बीसीसीआयला फटकारले

रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आठ गडी राखून पराभव केला होता. या स्पर्धेत चेन्नईच्या संघाने मिळवलेला हा चौथा विजय होता. तथापि, संघ 8 गुणांसह टेबलमध्ये सर्वात कमी आठव्या स्थानावर आहे. पण राजस्थान रॉयल्स संघाने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून चेन्नईच्या संघाला स्पर्धेबाहेर केले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now