IND vs AUS 3rd ODI Pitch Report: राजकोटमध्ये कोणाचे असेल वर्चस्व, गोलंदाज की फलंदाज? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल

राजकोटच्या खेळपट्टीचा (Saurashtra Cricket Association Stadium Pitch Report) गोलंदाज किंवा फलंदाजाला अधिक फायदा होऊ शकतो का ते जाणून घेऊया.

IND vs AUS (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium in Rajkot) होणार आहे. भारताला हा सामना जिंकून क्लीन स्वीप करायचा आहे आणि ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकून आपली लाज वाचवायची आहे. भारतीय संघाने पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून मालिका जिंकली आहे. राजकोटच्या खेळपट्टीचा (Saurashtra Cricket Association Stadium Pitch Report) गोलंदाज किंवा फलंदाजाला अधिक फायदा होऊ शकतो का ते जाणून घेऊया. (हे देखील वाचा: Rohit Sharma Press Conferance: तिसऱ्या वनडेसाठी भारताकडे केवळ 13 खेळाडू, काही खेळाडूंना व्हायरल तर काही वैयक्तिक कारणांमुळे चिंतेत)

राजकोट स्टेडियम खेळपट्टी अहवाल

राजकोट क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. येथील पृष्ठभाग सपाट आहे, त्यामुळे चेंडूचा बॅटशी चांगला संपर्क येतो आणि धावा काढण्यात कोणतीही अडचण येत नाही. या खेळपट्टीवर फलंदाज स्फोटक फलंदाजी करतात. पाहिले तर ही खेळपट्टी फलंदाजांना पूर्णपणे मदत करते.

खेळपट्टी फलंदाजीसाठी एक आदर्श खेळपट्टी

वेगवान गोलंदाजांना सामन्याच्या सुरुवातीला थोडी मदत मिळू शकते आणि मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांनाही काही वळण मिळू शकते. शेवटी ही खेळपट्टी फलंदाजीसाठी एक आदर्श खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर, एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्या डावात अंदाजे 310 ते 320 धावा केल्या जातात. यासोबतच दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्याही 290 प्लसच्या आसपास आहे.

राजकोटचा हवामान अहवाल

वेदरकॉमने दिलेल्या हवामान अंदाजानुसार, बुधवारी राजकोटमध्ये कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान 25 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. संपूर्ण सामन्यात पाऊस आणि ढगाळ आकाश असण्याची 20% शक्यता आहे.