IND vs ENG 1st Test: पहिल्या कसोटीत कोणत्या खेळाडूंना मिळेल संधी, अशी असू शकते भारताची प्लेइंग 11

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी संघाचा पहिला सामना 25 ते 29 जानेवारी दरम्यान खेळवला जाणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या मैदानावर भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचा अनोखा विक्रम आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

IND vs ENG 1st Test: इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय संघातून आपले नाव काढून घेतले आहे. कोहलीच्या जागी रजत पाटीदारचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, पाटीदारला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते का? ड्रेसिंगरूमध्ये बसुन राहणार हे पाहणे बाकी आहे. पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय संघात कोणत्या खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो हे आम्ही तुम्हाला सांगतो. (हे देखील वाचा: IND vs ENG 1st Test: इंग्लंडने पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग 11 केली घोषणा, अँडरसन बाहेर; 'या' खेळाडूला मिळाली पदार्पणाची संधी)

अश्विन आणि जडेजा खेळण्याची खात्री

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी संघाचा पहिला सामना 25 ते 29 जानेवारी दरम्यान खेळवला जाणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या मैदानावर भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचा अनोखा विक्रम आहे. अश्विनने या मैदानावर सर्वाधिक कसोटी बळी घेतले आहेत. या खेळाडूने येथे खेळलेल्या एकूण 4 सामन्यात 27 विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रवींद्र जडेजानेही येथे खेळल्या गेलेल्या एकूण 3 सामन्यांमध्ये 15 बळी घेतले आहेत. अशा स्थितीत या दोघांचाही पहिल्या कसोटीत नक्कीच समावेश होऊ शकतो.

पाटीदाराला संधी मिळणार का?

या सामन्यात विराट कोहली भारतीय संघाचा भाग नसल्यामुळे त्याच्या जागी पाटीदारचा संघात समावेश करण्यात आला आहे. अशा स्थितीत पाटीदारलाही संघात स्थान मिळणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, केएल राहुल भारतीय संघासाठी कीपिंग करणार नाही. काल भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की केएल राहुल फक्त फलंदाज म्हणून खेळेल, अशा परिस्थितीत भारतीय संघाला यष्टीरक्षक फलंदाजाचीही गरज भासणार आहे. केएस भरतचा संघात समावेश करून त्याला संघात ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोण देणार सलामी?

भारत 3 फिरकीपटूंसह खेळेल, अशी अपेक्षा आहे, अशा स्थितीत अक्षर पटेलही खेळणार हे निश्चित मानले जात आहे. गोलंदाजीत मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. आणखी एक वेगवान गोलंदाज म्हणून मुकेश कुमारचा समावेश होऊ शकतो. फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, यशस्वी जैस्वालने रोहित शर्मासोबत ब-याच काळापासून ओपनिंग केली आहे, त्यामुळे त्याचा पुन्हा एकदा संघात समावेश केला जाऊ शकतो.

कशी असू शकते भारताची प्लेइंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रजत पाटीदार, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement