भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ त्रिकोणी मालिका 2026 चे थेट प्रक्षेपण कुठे पाहावे?

श्रीलंकेत सुरू असलेल्या त्रिदेशीय 'अ' संघ मालिकेतील ५ व्या सामन्यात आज भारत अ आणि अफगाणिस्तान अ हे संघ आमनेसामने येत आहेत. भारतीय क्रिकेट चाहत्यांना हा सामना टीव्ही आणि ऑनलाईन कधी व कुठे पाहता येईल, याची सविस्तर माहिती.

श्रीलंकेत सुरू असलेल्या त्रिदेशीय 'अ' संघ क्रिकेट मालिकेला आता कमालीचे रंगतदार वळण मिळाले आहे. या मालिकेतील अत्यंत महत्त्वाच्या ५ व्या सामन्यात आज, १७ जून २०२६ रोजी भारत 'अ' आणि अफगाणिस्तान 'अ' यांच्यात लढत होत आहे. हा सामना डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात असून भारतीय वेळेनुसार सकाळी १०:०० वाजता सामन्याला सुरुवात झाली आहे. आगामी बाद फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना गुणांच्या कमाईसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

गुणतालिकेतील सद्यस्थिती

मालिकेत आतापर्यंत ४ सामने पूर्ण झाले असून यजमान श्रीलंका 'अ' संघ ३ सामन्यांत २ विजयांसह ४ गुण मिळवून अव्वल स्थानी आहे. भारतीय 'अ' संघाने ३ सामन्यांपैकी १ सामन्यात विजय मिळवला असून २ सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या भारतीय संघ २ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तान 'अ' संघाने २ सामने खेळले असून १ विजय आणि १ पराभवासह त्यांचेही २ गुण आहेत. आजचा विजय दोन्ही संघांना अंतिम फेरीच्या शर्यतीत मजबूत स्थितीत पोहोचवू शकतो.

भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ आजचा सामना थेट

लाईव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे पाहायचे?

भारतीय क्रिकेट चाहत्यांना या चुरशीच्या सामन्याचा आनंद टीव्ही आणि डिजिटल स्क्रीनवर घेता येणार आहे. भारतात या मालिकेचे अधिकृत प्रक्षेपण हक्क 'सोनी स्पोर्ट्स नेटवर्क'कडे आहेत.

टीव्ही टेलिकास्ट: हा सामना भारतातील प्रेक्षक 'सोनी स्पोर्ट्स नेटवर्क'च्या (Sony Sports Network) चॅनेल्सवर थेट पाहू शकतात.

ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग: डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामना पाहू इच्छिणारे चाहते 'सोनी लिव्ह' (Sony LIV) या ॲप आणि वेबसाइटवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतील.

इतर देशांसाठी: भारत सोडून इतर देशांतील (उदा. युके, युएसए, ऑस्ट्रेलिया) क्रिकेट चाहत्यांसाठी 'श्रीलंका क्रिकेट'च्या (Sri Lanka Cricket) अधिकृत यूट्यूब चॅनेलवर हा सामना विनामूल्य लाईव्ह स्ट्रीम केला जात आहे.

भारत अ विरुद्ध अफगाणिस्तान अ थेट स्कोअर

दोन्ही संघांचे संभाव्य खेळाडू आणि नेतृत्व

भारतीय 'अ' संघाचे नेतृत्व युवा फलंदाज टिळक वर्मा करत आहे. भारतीय संघात ऋतुराज गायकवाड, , आयुष बदोनी आणि प्रबसिमरन सिंग यांसारख्या आयपीएल स्टार्सचा समावेश आहे. तर दुसरीकडे इम्रान मीर हा अफगाणिस्तान 'अ' संघाची धुरा सांभाळत असून त्यांच्या ताफ्यात झहीर खान आणि बहीर शाह यांसारखे प्रतिभावान खेळाडू आहेत. डंबुलाच्या खेळपट्टीवर या युवा खेळाडूंमधील चुरस पाहणे नक्कीच रंजक ठरेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement