22 वर्षीय गोलंदाज हरीशंकर रेड्डी महेंद्रसिंह धोनीची विकेट घेतो तेव्हा, Watch Viral Video
22 वर्षीय गोलंदाज हरीशंकर रेड्डी (Harishankar Reddy) याने महेंद्रसिंह धोनीची त्याच्या नकळत घेतलेल्या विकेटचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे कळू शकलेले नाही.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा सर्व क्रिकेट प्रेमींचा श्वास रोखलेला असतो. त्याची फलंदाजी पाहणे हे सर्वांसाठी जणू पर्वणीच! पण त्याला एका 22 वर्षीय गोलंदाजाने बोल्ड केले हे तुम्हाला कळलं तर? विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. 22 वर्षीय गोलंदाज हरीशंकर रेड्डी (Harishankar Reddy) याने महेंद्रसिंह धोनीची त्याच्या नकळत घेतलेल्या विकेटचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे कळू शकलेले नाही.
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज(CSK)चे नेतृत्व करतोय. चेन्नईचा संघ सध्या आयपीएलच्या 14 व्या हंगामाची जोरदार तयारी करत आहे. या तयारीचा भाग म्हणून सराव लढतीत धोनीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.हेदेखील वाचा- IND vs ENG 4th T20I 2021: ‘करो या मरो’च्या चौथ्या टी-20 साठी Team India मध्ये होणार मोठे बदल? पहा इंग्लंडविरुद्ध भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
या व्हिडिओत सराव सत्रात 22 वर्षाच्या हरीशंकर रेड्डी याने धोनीची नजर चुकवत घेतलेली विकेट पाहण्यासारखी आहे. ही विकेट घेतल्यानंतर हरीशंकरच्या चेह-यावरील आनंद दिसत आहे.
दरम्यान हरीशंकरने बुधवारी इस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो धोनी सोबत दिसतोय. हा फोटो शेअर करताना त्याने Dream Pic असे म्हटले आहे. फोटोत दोघांनी सीएसकेची जर्सी घातली आहे.
हरीशंकर रेड्डीला चेन्नईने 20 लाख रुपयांना संघात समावेश करून घेतले आहे. त्याने आंध्र प्रदेशकडून विजय हजारे ट्रॉफी आणि सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत शानदार कामगिरी केली होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)