Zimbabwe vs Afghanistan T20I Stats: टी-20 मध्ये झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम? येथे पहा हेड टू हेड आकडेवारी; सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडू
ZIM vs AFG: झिम्बाब्वे संघाने नुकतीच पाकिस्तानविरुद्धची मायदेशातील मालिका 2-1 ने गमावली. आयसीसी पुरुषांच्या टी-20 संघ क्रमवारीत अफगाणिस्तान सध्या 10 व्या स्थानावर आहे, तर झिम्बाब्वे 12 व्या स्थानावर आहे. सिकंदर रझा या मालिकेत झिम्बाब्वेचे नेतृत्व करणार आहे. तर अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व रशीद खानकडे आहे.
Zimbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team 1st T20 2024: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (ZIM vs AFG) यांच्यातील पहिला टी-20 सामना 11 डिसेंबर रोजी म्हणजे आज हरारे स्पोर्ट्स क्लब येथे संध्याकाळी 5.00 होणार आहे. झिम्बाब्वे संघाने नुकतीच पाकिस्तानविरुद्धची मायदेशातील मालिका 2-1 ने गमावली. आयसीसी पुरुषांच्या टी-20 संघ क्रमवारीत अफगाणिस्तान सध्या 10 व्या स्थानावर आहे, तर झिम्बाब्वे 12 व्या स्थानावर आहे. सिकंदर रझा या मालिकेत झिम्बाब्वेचे नेतृत्व करणार आहे. याशिवाय ट्रेवर ग्वांडू, ताशिंगा मुसेकिवा आणि टिनोटेंडा मापोसा या युवा चेहऱ्यांना संघात संधी देण्यात आली आहे. (हे देखील वाचा: ZIM vs AFG 1st T20I 2024 Pitch Report: आजच्या सामन्यात गोलंदाज की फलंदाज कोण पडणार कुणावर भारी, जाणून घ्या हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावरील खेळपट्टीचा अहवाल)
राशिद खानकडे अफगाणिस्तान संघाची कमान
दुसरीकडे राशिद खान अफगाणिस्तान संघाची कमान सांभाळणार आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या ACC पुरुष T20 इमर्जिंग आशिया कप 2024 च्या विजेतेपदासाठी अफगाणिस्तानचे नेतृत्व केल्यानंतर युवा फलंदाजी अष्टपैलू झुबैद अकबरीचा प्रथमच टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. फिरकीपटू मुजीब उर रहमानचा उजव्या पायाच्या दुखापतीतून बरा झाल्यानंतर टी-20 संघात परतला आहे.
दोन्ही संघांमध्ये हेड टू हेड रेकॉर्ड
टी-20 मध्ये झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघ 15 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये अफगाणिस्तानचा वरचष्मा दिसत आहे. अफगाणिस्तानने 15 पैकी 14 टी-20 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेने फक्त 1 सामना जिंकला आहे. यावरून अफगाणिस्तानचा संघ अधिक मजबूत असल्याचे दिसून येते.
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद नबीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. मोहम्मद नबीने झिम्बाब्वेविरुद्धच्या 15 सामन्यांच्या 15 डावात 37.54 च्या सरासरीने आणि 161.96 च्या स्ट्राईक रेटने 413 धावा केल्या आहेत. या काळात मोहम्मद नबीने अर्धशतक झळकावले असून 52 धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज
मोहम्मद नबी (अफगाणिस्तान)- 413
नजीबुल्ला झद्रान (अफगाणिस्तान)- 325
सिकंदर रझा (झिम्बाब्वे)- 285
मोहम्मद शहजाद (अफगाणिस्तान)- 277
रहमानउल्ला गुरबाज (अफगाणिस्तान)- 252
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 सामन्यात अफगाणिस्तानच्या राशिद खानने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. राशिद खानने झिम्बाब्वेविरुद्धच्या 15 सामन्यात 16.08 च्या सरासरीने आणि 6.37 च्या इकॉनॉमीने 23 बळी घेतले आहेत.
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे 5 गोलंदाज
राशिद खान (अफगाणिस्तान) - 23
दौलत झद्रान (अफगाणिस्तान) - 12
मोहम्मद नबी (अफगाणिस्तान)- 11
आशीर्वाद मुझाराबानी (झिम्बाब्वे) - 11
रायन पॉन्सनबी बर्ल (झिम्बाब्वे) - 9
दोन्ही संघाचे खेळाडू
झिम्बाब्वे टी-20 संघ: सिकंदर रझा (कर्णधार), फराज अक्रम, ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ट्रेवर ग्वांडू, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेस्ली माधवेरे, टिनोटेंडा माफोसा, तदिवानशे मारुमनी (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, ब्रँडन मावुथा, ताव्वा, ब्रँडन मावुता, ता. मुझाराबानी, डायोन मायर्स, रिचर्ड नगारावा
अफगाणिस्तान टी-20 संघ: राशिद खान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), मोहम्मद इशाक (विकेटकीपर), सेदीकुल्ला अटल, हजरतुल्ला झाझाई, मोहम्मद नबी, दरविश रसौली, झुबैद अकबरी, गुलबदीन नायब, करीम जनात, अजमातुल्ला उमरझाई, नांग्याल खरोती, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजल हक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)