Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

ज्यामध्ये अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा 2-1 ने पराभव करत मालिका नावावर केली. अशा परिस्थितीत दोन्ही संघाच्या नजरा एकदिवसीय मालिकेकडे लागल्या आहेत. वनडे मालिकेत झिम्बाब्वेचे कर्णधारपद क्रेग एर्विनच्या खांद्यावर असेल. तर दुसरीकडे हशमतुल्ला शाहिदी अफगाणिस्तानची कमान सांभाळेल.

AFG vs ZIM (Photo Credit - X)

Zimbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team 1st ODI 2024: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात येणार आहे. उभय संघांमध्ये पहिली तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली. ज्यामध्ये अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा 2-1 ने पराभव करत मालिका नावावर केली. अशा परिस्थितीत दोन्ही संघाच्या नजरा एकदिवसीय मालिकेकडे लागल्या आहेत. वनडे मालिकेत झिम्बाब्वेचे कर्णधारपद क्रेग एर्विनच्या खांद्यावर असेल. तर दुसरीकडे हशमतुल्ला शाहिदी अफगाणिस्तानची कमान सांभाळेल. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

हेड टू हेड आकडेवारी

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान वनडेमध्ये 28 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये अफगाणिस्तानचा वरचष्मा दिसत आहे. अफगाणिस्तानने 28 पैकी 18 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेने केवळ 10 सामने जिंकले आहेत. यावरून अफगाणिस्तानचा संघ अधिक मजबूत असल्याचे दिसून येते. मात्र, घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा झिम्बाब्वेला मिळू शकतो.

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानच्या रहमत शाहने सर्वाधिक धावा केल्या आहेत. रहमत शाहने झिम्बाब्वेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या 4 डावात 68.00 च्या सरासरीने आणि 91.27 च्या स्ट्राईक रेटने 272 धावा केल्या आहेत. या काळात रहमत शाहने 2 अर्धशतकं आणि एक शतक आणि 114 धावा ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज

रहमत शाह (अफगाणिस्तान)- 272

हॅमिल्टन मसाकादझा (झिम्बाब्वे)- 266

मोहम्मद शहजाद (अफगाणिस्तान)- 237

मोहम्मद नबी (अफगाणिस्तान)- 223

सिकंदर रझा (अफगाणिस्तान) - 210

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानच्या राशिद खानने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. राशिद खानने झिम्बाब्वेविरुद्धच्या 21 सामन्यात 14.27 च्या सरासरीने आणि 3.98 च्या इकॉनॉमीने 47 बळी घेतले आहेत. (हे देखील वाचा: ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद)

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारे 5 गोलंदाज

राशिद खान (अफगाणिस्तान)- 47

मोहम्मद नबी (अफगाणिस्तान)- 37

दौलत झद्रान (अफगाणिस्तान)- 29

आमिर हमजा (अफगाणिस्तान) - 26

अलेक्झांडर ग्रॅमी क्रेमर (झिम्बाब्वे) - 26

दोन्ही संघांचे खेळाडू

झिम्बाब्वे संघ: ब्रायन बेनेट, तादिवनाशे मारुमणी (विकेटकीपर), डिओन मायर्स, क्रेग एर्विन (कर्णधार), शॉन विल्यम्स, अलेक्झांडर रझा, ताशिंगा मुसेकिवा, टिनोटेंडा मापोसा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, व्हिक्टर न्याउची, वेलिंग्टन मसाकादझा, ट्रेव्हर ग्वांडू, जॉयलॉर्ड गॅम्बी, बेन कुरान, न्यूमन न्यामौरी

अफगाणिस्तान संघ: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), रहमत शाह, सेदीकुल्लाह अटल, दरविश रसूली, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, एएम गझनफर, नांगेलिया खारोते अहमद मलिक, इक्रम अलीखिल, अब्दुल मलिक, बिलाल सामी, नवीद झद्रा



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Stumps: बुमराह-आकाशने केला चमत्कार, फॉलोऑनचा धोका टळला; चौथ्या दिवसाअखेर भारताच स्कोर 252/9

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना