Sharjah Cricket Ground वरील West Stand आता Sachin Tendulkar Stand म्हणून ओळखले जाणार (Watch Video)
संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) सोमवारी (24 एप्रिल) भारताच्या माजी कर्णधारासाठी (तेंडुलकर) एक खास समारंभ आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये ‘वेस्ट स्टँड’चे (West Stand) नाव बदलून ‘सचिन तेंडुलकर स्टँड’ (Sachin Tendulkar Stand) असे करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनोखी भेट देण्यात आली आहे. शारजा क्रिकेट स्टेडियममध्ये (Sharjah Cricket Stadium) ‘वेस्ट स्टँड’ स्टँडला सचिन तेंडूलकर यांचे नाव देण्यात आले आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) सोमवारी (24 एप्रिल) भारताच्या माजी कर्णधारासाठी (तेंडुलकर) एक खास समारंभ आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये ‘वेस्ट स्टँड’चे (West Stand) नाव बदलून ‘सचिन तेंडुलकर स्टँड’ (Sachin Tendulkar Stand) असे करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली.
सचिन तेंडूलकर यांनी एप्रिल 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्टेडियमवर 'डेझर्ट स्टॉर्म' नावाच्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात 143 धावा केल्या होत्या. जेव्हा वाळूच्या वादळामुळे खेळ 25 मिनिटे विस्कळीत झाला होता. तेंडूलकर यांच्या खेळीने भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत नेले. हा सामना संस्मरणीय ठरण्याचे आणखी एक कारण म्हणजे या सामन्या सचिनने त्याच्या 25व्या वाढदिवसाला 134 धावा ठोकल्या आणि हा सामना भारताने सहा गडी राखून जिंकला. (हेही वाचा, Sachin Tendulkar 50th Birthday: सचिनला त्याच्या 50 व्या वाढदिवशी ऑस्ट्रेलियात मिळाला मोठा मान, आता इथले सगळे करतील त्याला सलाम)
सचिन तेंडुलकर हा निवृत्त भारतीय क्रिकेटपटू आहे. जो क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तेंडुलकरने वयाच्या 16 व्या वर्षी भारतीय क्रिकेट संघात पदार्पण केले. दोन दशकांहून अधिक काळ कारकीर्द गाजवली. कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) दोन्ही क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा यासह क्रिकेटमधील अनेक विक्रम सचिन यांच्या नावावर आहेत. तेंडुलकर त्यांच्या निर्दोष तंत्रासाठी, अचूकतेसाठी आणि सर्व प्रकारच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची क्षमता यासाठी ओळखला जातो. तो विशेषतः त्याच्या स्ट्रेट ड्राईव्ह आणि कव्हर ड्राईव्हसाठी ओळखला जात असे, जे क्रिकेटमधील काही सर्वात मोहक शॉट्स मानले जात होते.
व्हिडिओ
सचिनच्या एकूण कारकिर्दीत, सचिनला 1997 मध्ये प्रतिष्ठित विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार आणि 1994 मध्ये अर्जुन पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. क्रिकेट विश्वात 100 आंतरराष्ट्रीय शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)