West Indies Tour of India 2022: वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यावर कोरोनाचे सावट, BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Report

सध्याच्या वेळापत्रकानुसार हे सामने भारतातील सहा वेगवेगळ्या ठिकाणी होतील. भारताचा फेब्रुवारीमध्ये घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध तीन एकदिवसीय आणि तितक्याच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

West Indies Tour of India 2022: भारतात COVID-19 प्रकरणांमध्ये (India COVID Cases) अचानक वाढ झाल्यामुळे BCCI च्या टीम इंडियाच्या (Team India) मायदेशात होणाऱ्या सामन्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो आणि बोर्डाला स्थळांची संख्या मर्यादित करण्यास भाग पाडू शकते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेली टीम इंडिया फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) सहा सामन्यांच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी तीन वनडे आणि तितक्याच T20 सामने खेळणार आहे. सध्याच्या वेळापत्रकानुसार अहमदाबाद (6 फेब्रुवारी), जयपूर (9 फेब्रुवारी), कोलकाता (12 फेब्रुवारी) आणि कटक (15 फेब्रुवारी), विशाखापट्टणम (18 फेब्रुवारी) आणि तिरुवनंतपुरम (20 फेब्रुवारी) येथे तीन टी-20 सामने अशी सहा ठिकाणे वेगवेगळे सामने आयोजित करणार आहे. तथापि PTI, वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार बोर्ड देशभरातील दोन्ही संघाचे खेळाडू आणि कर्मचारी यांच्या हालचालींवर बंदी घालण्यासाठी स्थळांची संख्या कमी करण्याचा विचार करू शकते आणि ज्यामुळे व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका कमी होईल.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “आतापर्यंत काहीही ठरवले गेले नाही. ही एक अस्थिर स्थिती आहे आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ.” दरम्यान, क्रिकेट वेस्ट इंडीजने (CWI) म्हटले की संपूर्ण मालिका मर्यादित ठिकाणी खेळवण्यावर विचार करण्यासाठी सज्ज आहेत. सध्या आयर्लंड विरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळत असलेला वेस्ट इंडियाज संघ इंग्लंड विरुद्ध 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर 1 फेब्रुवारी रोजी भारतात दाखल होईल. अहमदाबाद येथे पोहोचल्यानंतर, खेळाडूंना 4 आणि 5 फेब्रुवारी, दोन दिवस सराव सत्रापूर्वी तीन दिवस अनिवार्य क्वारंटाईन राहावे लागेल. कसोटी संघ कॅरिबियनमध्ये असताना, इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांपूर्वी किरोन पोलार्डच्या नेतृत्वात व्हाईट बॉल संघ भारतात येणार आहे.

भारतीय संघ 23 जानेवारी रोजी तीन एकदिवसीय सामन्यांनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून मायदेशी परतेल. त्यानंतर आयपीएल सुरू होण्यापूर्वी वेस्ट इंडिज (3 वनडे आणि टी-20) आणि श्रीलंका (2 कसोटी, 3 टी-20) असे मायदेशात मालिका खेळणार आहे. दरम्यान, वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर बोर्डाला देशांतर्गत स्पर्धा रणजी करंडक, कर्नल सीके नायडू ट्रॉफी आणि वरिष्ठ महिला T20 लीग 2021/22 हंगाम आणि अनेक देशांतर्गत स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत.