SL vs WI 2nd T20I 2024 Live Streaming: दुसऱ्या टी 20 मध्ये वेस्ट इंडिज श्रीलंकेचा पराभव करून मालिका जिंकायच्या प्रयत्नात; सामना केव्हा, कुठे आणि कसा पहाल?

सोनी लाईव्ह  ॲप आणि वेबसाइटवर चाहते श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिजचा दुसरा T20 सामना पाहू शकतात. तसेच, श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या T20 सामन्याचे थेट प्रवाह फॅनकोड ॲपवर देखील उपलब्ध असेल.

Photo Credit- x

SL vs WI 2nd T20I 2024 Live Streaming: श्रीलंका आणि वेस्ट इंडिज (SL vs WI) संघात आज 2रा टी20 सामना 15 ऑक्टोबर रोजी रविवारी भारतीय वेळेनुसार सध्याकाळी 7 वाजता रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rangiri Dambulla International Stadium)खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा टी 20 सामना आज होणार आहे. वेस्ट इंडिजने (West Indies Cricket Team) मालिकेतील पहिला टी20 सामना 5 विकेटने जिंकला. आता संघ दुसऱ्या विजयासाठी मैदानात उतरेल. दुसरीकडे, पहिला टी 20 सामना गमावलेल्या श्रीलंका संघाला (Sri Lanka Cricket Team )बरोबरी साधायची आहे. मालिका निर्णायक सामन्यापर्यंत नेण्यासाठी श्रीलंका संघ सर्वतोपरी प्रयत्न करेल. (हेही वाचा:PAK vs ENG 2nd Test, Multan Weather & Pitch Report: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड दुसरऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचे संकट? मुलतानमधील खेळपट्टी आणि हवामान परिस्थीतीबद्दल घ्या जाणून )

वेस्ट इंडिज आणि श्रीलंका संघ टी 20 फॉरमॅटमध्ये 16 वेळा आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांनी 8-8 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.

सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?

श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी 20 सामना 15 ऑक्टोबर मंगळवारी रोजी रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल. तर, सामन्याची नाणेफेक संध्याकाळी 06:30 वाजता होईल.

सामना टीव्ही चॅनलवर कुठे पाहू शकता?

श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज टी 20 मालिका 2024 चे प्रसारण हक्क सोनी स्पोर्टर्स नेटवर्ककडे आहेत. चाहते सोनी टेन फाई चॅनलवर सामना पाहू शकतात.

ऑनलाइन मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग कसे पहावे?

सोनी लाईव्ह भारतात श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज टी-20 मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग प्रदान करेल. सोनी लाईव्ह ॲप आणि वेबसाइटवर चाहते श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिजचा दुसरा टी 20 सामना पाहू शकतात. तसेच, फॅनकोड ॲपवर देखील सामन्याचे प्रक्षेपण उपलब्ध असेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif