वेस्ट इंडिज चे महान क्रिकेटपटू एवर्टन वीक्स यांना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल; चाहत्यांनी ट्विटर वर दिल्या शुभेच्छा
बीबीसी च्या रिपोर्ट नुसार, 94 वर्षाचे वीक्स यांना क्वीन एलिझाबेथ रुग्णालयाच्या आईसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
वेस्ट इंडिज (West Indies) चे महान क्रिकेटपडू एवर्टन वीक्स (Everton Weeks) यांना गुरुवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बीबीसी (BBC) च्या रिपोर्ट नुसार, 94 वर्षाचे वीक्स यांना क्वीन एलिझाबेथ रुग्णालयाच्या (Queen Elizabeth Hospital) आईसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच बरे होतील असं डॉक्टरांनी सांगितलंय. वेस्ट इंडिजकडून खेळताना वीक्स यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सलग पाच डावात शतक कऱण्याचा विक्रम केला होता. त्यांनी 48 कसोटीत 4 हजार 455 धावा केल्या आहेत. शिवाय, 1949 मध्ये त्यांनी सलग शतके करण्याची कामगिरी केली होती.
वीक्स यांनी 1957-58 मध्ये पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध खेळताना झालेल्या दुखापतीने क्रिकेटमधून सन्यास घेतलं. त्यांना 1995 मध्ये नाइटहूडने गौरवण्यात आलं आहे. वीक्स यांच्या तब्येती बद्दल माहिती मिळताच चाहत्यांनी ट्विटर द्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, आयसीसी (ICC) ने 2009 मध्ये वीक्स यांना क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान दिलं. त्यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 1 हजार धावा करण्याचा विक्रम आहे. त्यांनी फक्त 12 डावात ही कामगिरी केली होती. त्यांच्यासोबत हर्बर्ट सटक्लिफने 12 डावात हजार धावा केल्या होत्या.
दुरीकडे, वेस्ट इंडिज चे माजी कर्णधार आणि महान खेळाडू ब्रायन लारा (Brian Lara) यांना छातीत वेदना झाल्यामुळे मुंबई च्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तथापी लारा आता बरे आहे आणि बुधवारी त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली असून ते आयसीसी विश्वकपसाठी विश्लेषण करण्यासाठी परतले आहे. लारा म्हणाले की त्यांना सकाळी कसरत केल्यानंतर अस्वस्थ वाटले होते.