WBBL 2021: स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये दाखवणार दम, ‘या’ संघासोबत केला करार
स्मृतीची ही तिसरी टीम असेल. यापूर्वी स्टार भारतीय ओपनर होबार्ट हरिकेन्स आणि ब्रिस्बेन हीटसाठी खेळली होती. या उलट दीप्ती तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच प्रमुख महिला टी-20 स्पर्धेत भाग घेणार आहे.
WBBL 2021: भारताची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा (Deepti Sharma) यांना ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या महिला बिग बॅश लीगच्या (Women's Big Bash League) सहाव्या आवृत्तीसाठी गतविजेता सिडनी थंडरने (Sydney Thunder) करारबद्ध केले आहे. स्मृतीची ही तिसरी टीम असेल. यापूर्वी स्टार भारतीय ओपनर होबार्ट हरिकेन्स आणि ब्रिस्बेन हीटसाठी खेळली होती. या उलट दीप्ती तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच प्रमुख महिला टी-20 स्पर्धेत भाग घेणार आहे. भारतीय संघाच्या चालू दौऱ्याचा एक भाग म्हणून स्मृती आणि दीप्ती दोघीही ऑस्ट्रेलियात (Australia) आहेत आणि 14 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या फ्रँचायझी लीगसाठी परत राहतील. सलामीवीर मंधाना ऑस्ट्रेलियात उत्कृष्ट विक्रमाची अभिमान बाळगते आणि शुक्रवारी दुसऱ्या सामन्यात तिने भारतासाठी मॅके येथे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 94 चेंडूत 86 धावा केल्या. सिडनी थंडर 16 ऑक्टोबर रोजी होबार्टमधील ब्लंडस्टोन एरिना येथे अॅडलेड स्ट्रायकर्स विरुद्ध त्यांच्या विजेतेपद बचावाची सुरुवात करेल. (टीम इंडियाच्या दोन तडाखेबाज टी-20 खेळाडू शेफाली वर्मा आणि राधा यादव WBBL मध्ये डेब्यूसाठी सज्ज)
यजमानांविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला रोमहर्षक सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. दुसरीकडे, दीप्तीने सामन्यात 23 धावा देऊन एक विकेट घेतली. सिडनी थंडरचे प्रशिक्षक ट्रेव्हर ग्रिफिन यांनी रविवारी सांगितले की, भारतीय खेळाडूंची भर पडल्याने जेतेपदाच्या बचावासाठी मैदानात उतरणारा संघ आणखी मजबूत होईल. तसेच मंधाना म्हणाली, “परदेशी लीगमध्ये खेळल्याने तुम्हाला खूप अनुभव मिळतो, विशेषतः टी-20 फॉरमॅटमध्ये.” ती म्हणाली, “तुम्ही जगभरातील सर्व खेळाडूंसोबत बरेच अनुभव शेअर करता. त्यामुळे तुम्हाला खूप शिकायला मिळते. मी नेहमी 'दबाव' ऐवजी शिकण्याची संधी म्हणून पाहते.” हेदर नाईट आणि टॅमी ब्यूमोंट, ज्यांनी गेल्या वर्षी संघाच्या जेतेपद जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यांच्या जागी मंधाना आणि शर्माला संधी मिळाली आहे. लक्षात घ्यायचे की भारतीय क्रिकेट शेफाली वर्मा आणि राधा यादव देखील WBBL मध्ये झळकणार आहेत.
दुसरीकडे, सिडनी थंडरचे मुख्य प्रशिक्षक ग्रिफिन हेदर नाईटच्या अनुपस्थितीमुळे निराश झाले आहेत पण त्यांनी दीप्तीच्या अष्टपैलू म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक केले. गिफिनने संघाच्या अधिकृत वेबसाईटवर म्हटले की, “हेदर नाईट परत येत नाही हे पाहून निराशा झाली, पण तिच्या जागी कोणत्या खेळाडूचा समावेश करावा असे कोणी म्हटले तर ती दीप्ती शर्मा असेल. ती एक स्टार खेळाडू आहे. ती फलंदाजीने चांगले योगदान देते. दीप्ती एक मॅच विनर खेळाडू आहे. आणि तिला पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे. याशिवाय ती मधल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करू शकते.”