श्रीलंकेचा ऑलराऊंडर Thisara Perera चमकला; एका ओव्हरमध्ये ठोकले 6 षटकार, पाहा व्हिडिओ

क्रिकेट इतिहासात एका ओव्हरमध्ये 6 षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसरा परेरा (Thisara Perera) याचाही समावेश झाला आहे. थिसरा परेराने एकाच षटकात 6 षटकार ठोकणारा श्रीलंकेचा पहिला खेळाडू ठरला आहे.

Thisara Perera (Photo Credit: Twitter)

क्रिकेट इतिहासात एका ओव्हरमध्ये 6 षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसरा परेरा (Thisara Perera) याचाही समावेश झाला आहे.  एकाच षटकात 6 षटकार ठोकणारा थिसरा परेरा हा श्रीलंकेचा पहिला खेळाडू ठरला आहे. श्रीलंकेमध्ये सध्या श्रीलंका क्रिकेट बोर्ड आयोजिक मेजर क्लब्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत खेळताना थिसेरा परेराने हा पराक्रम केला आहे. त्याने रविवारी (28 मार्च) आर्मी स्पोट्स क्रिकेट क्लबकडून खेळताना एका षटकात सलग 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. तसेच त्याने जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

रविवारी आर्मी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध ब्लूमफिल्ड क्रिकेट आणि ऍथलेटिक क्लब यांच्यात पार पडला. मात्र, पावसामुळे हा सामना 41 षटकांचा खेळवण्यात आला होता. या सामन्यात आर्मी स्पोर्ट्स क्लब प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. महत्वाचे म्हणजे, या सामन्याचे केवळ 20 चेंडू शिल्लक राहिले असता कर्णधार थिसरा परेरा 5 व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. त्यानंतर धिल्हन कुरेने टाकलेल्या एका षटकार त्याने सलग 6 षटकार मारण्याचा कारनामा केला. तसेच केवळ 13 चेंडूत अर्धशकत करण्याचा विक्रमही स्वत:च्या नावावर नोंदवला आहे. हे देखील वाचा- IND vs ENG 3rd ODI 2021: टीम इंडियाने तिसऱ्या वनडेत केले असते ‘हे’ काम तर वेळेपूर्वीच लागला असता सामन्याचा निकाल

ट्विट-

क्रिकेटमध्ये एकाच षटकात 6 षटकार मारणारा परेरा हा एकूण 9 वा क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी सर गॅरी सोबर्स, रवी शास्त्री, हर्षल गिब्स, युवराज सिंग, रॉस व्हाईटली, हझरतुल्लाह झझाई, लिओ कार्टर आणि कायरन पोलार्ड यांनी असा कारनामा केला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

SL vs AUS 2nd Test 2025 Day 2 Live Scorecard: दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने 2 गडी गमावून जोडल्या 85 धावा, श्रीलंकेचा पहिला डाव 257 धावांवर आटोपला, पाहा सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड

SL vs AUS, 2nd Test Match 2025 Day 1 Stumps Scorecard: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंकाने 9 विकेट गमावून केल्या 229 धावा, दिनेश चांदीमल आणि कुसल मेंडिस यांनी झळकावले अर्धशतके; येथे पाहा स्कोरकार्ड

SL vs AUS 2nd Test 2025 Live Streaming: श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी अन् कुठे पाहणार, जाणून घ्या थेट प्रक्षेपणाची सर्व माहिती

AUS Beat SL 1st Test 2025 Scorecard: पहिल्या कसोटीत सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा एक डाव आणि 242 ​​धावांनी केला पराभव, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमनची घातक गोलंदाजी

Share Now