कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याकरिता वीरेंद्र सेहवाग यांनी शेअर केला लता मंगेशकर यांच्या एका जुन्या गाण्याचा व्हिडिओ
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रदुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. संपूर्ण देशात कोरोना बाधित रुग्णाची संख्या 147 जाऊन पोहचली आहे. या जागतिक महामारीमुळे चित्रपट, क्रिडा अशा क्षेत्रातील कार्यक्रमांना पूर्णविराम मिळाला आहे.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रदुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. संपूर्ण देशात कोरोना बाधित रुग्णाची संख्या 147 जाऊन पोहचली आहे. या जागतिक महामारीमुळे चित्रपट, क्रिडा अशा क्षेत्रातील कार्यक्रमांना पूर्णविराम मिळाला आहे. या करोना व्हायरसमुळे प्रत्येकाच्या मनात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान राजकीय नेते, बॉलिवूड कलाकारांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. यात भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यानेही उडी घेतली आहे. भारताची गान कोकीळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे एक गाण शेअर करत नागरिकांना जागृत राहण्याचा इशारा दिला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.‘हाथ ना लगाइए…कीजिए इशारा दूर दूर से' असे या जुन्या गाण्याचे बोल आहेत.
नुकताच वीरेंद्र सेहवागने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना त्याने नागरिकांना स्वच्छ राहण्याचे आवाहन केले आहे. सेहवागने शेअर केलेला हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. सेहवागच्या क्रिकेट खेळण्याच्या स्टाईलवर सर्व क्रिकेटप्रेमी फिदा असतात. सेहवाग हा आपल्या अनोख्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्यामुळे वीरेंद्र सेहवाग यांनी सोशलमीडियावर शेअर केलेला या व्हिडिओला खूप प्रतिक्रिया आल्या आहेत. तसेच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एका व्हिडिओ द्वारा नागरिकांना कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याचे आवाहन केले होते. तसेच रेल्वे प्रशासनाने या व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागले आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या खास टिप्ससाठी बिग बींचे आभारदेखील मानले आहेत. हे देखील वाचा- Bowler Hai Ya Cristiano Ronaldo! आकाश चोपडा ने शेअर केला क्रिस्टियानो रोनाल्डोच्या स्टाईलमध्ये चेंडू रोखणाऱ्या गोलंदाजाचा आश्चर्यकारक Video
इन्स्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
Doori karona in times of #corona . Please stay safe and remain hygienic !
A post shared by Virender Sehwag (@virendersehwag) on
आतपर्यंत देशात करोना बाधितांची संख्या 147 वर पोहचली आहे. त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात करोना बाधितांची संख्या 42 वर पोहचली आहे. जगभरात 1 लाख 99 हजार 990 करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 82 हजार 022 करोनाचे रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)