Virat Kohli New Record: आशिया चषकात विराटचा बोलबाला, पाकिस्तानविरुद्ध शतकासह दोन विक्रमांना घातली गवसनी
एवढेच नाही तर विराटने आपल्या शतकासह दोन विश्वविक्रमही मोडले आहेत. विराटने पाकिस्तानविरुद्ध 84 चेंडूत शतक पूर्ण केले.
पाकिस्तानविरुद्धच्या सुपर 4 च्या हाय व्होल्टेज सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) आपली दमदार कामगिरी दाखवत शानदार शतक झळकावले. विराटच्या एकदिवसीय कारकिर्दीतील हे 47 वे शतक असले तरी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे एकूण 77 वे शतक आहे. एवढेच नाही तर विराटने आपल्या शतकासह दोन विश्वविक्रमही मोडले आहेत. विराटने पाकिस्तानविरुद्ध 84 चेंडूत शतक पूर्ण केले. विराटने या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. एवढेच नाही तर विराटने आपल्या खेळीच्या जोरावर दोन मोठे विश्वविक्रम मोडीत काढले आहेत. (हे देखील वाचा: KL Rahul Six Shadab Khan: अरे बाप रे! शादाब खानच्या चेंडूवर केएल राहुलने लगावला गगनचुंबी षटकार, कोहली-रोहित झाले थक्क (Watch Video)
पहिला रेकॉर्ड म्हणजे विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13000 धावा पूर्ण केल्या आहेत. विराट क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 13000 धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने आपलाच देशबांधव सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. विराटने अवघ्या 267 व्या डावात ही कामगिरी केली आहे. तर 13 हजार धावा पूर्ण करण्यासाठी सचिनला 321 डाव लागले. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर बसलेल्या ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने 341 डावांमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
सर्वात जलद 13000 धावा करणारे फलंदाज
- विराट कोहली- 267 डाव, 278 सामने
- सचिन तेंडुलकर- 321 डाव, 330 सामने
- रिकी पाँटिंग - 341 डाव, 350 सामने
- कुमार संगकारा- 363 डाव, 386 सामने
- सनथ जयसूर्या - 416 डाव, 428 सामने
हा विक्रमही काढला मोडीत
यासह विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर विराटचे हे सलग चौथे शतक आहे. याआधी विराटने श्रीलंकेविरुद्ध सलग तीन सामन्यात तीन शतके झळकावली होती. याआधी विराटने आपल्या तीन डावांमध्ये नाबाद 128, 131 आणि नाबाद 110 धावांची खेळी खेळली होती.