'मियाँ, तणाव घेऊ नको, मनाने मजबूत रहा'! Mohammed Siraj याच्या वडिलांच्या निधनानंतर Virat Kohli याच्या सकारात्मक शब्दांनी गोलंदाजाला मिळाले बळ
संघाचा प्रमुख विराट कोहलीने आपल्या सकारात्मक शब्दांनी सिराजचे मनोबल वाढवून पाठिंबा दर्शवला. विराट स्वत: या परिस्थितीला सामोरे गेला आहे त्यामुळे त्याने आपल्या अनुभवातून सिराजला प्रोत्साहन दिले.
ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर असलेल्या टीम इंडियाचा (India Tour of Australia) वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वडिलांच्या (Mohammed Siraj Father) निधनानंतर टीम मॅनेजमेंट आणि सहकारी खेळाडूंकडून भरपूर सहकार्य मिळत आहे. प्रेरणास्रोत गमावल्यानंतरही त्याने देशासाठी आपले कर्तव्य बजावण्याचे ठरवले आणि संघासाठी विजय मिळवण्याचा निश्चित केलं. यावर बीसीसीआय (BCCI) आणि चाहत्यांनी त्याचे कौतुक केले व त्याचे समर्थन केले. दुसरीकडे संघाचा प्रमुख विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या सकारात्मक शब्दांनी सिराजचे मनोबल वाढवून पाठिंबा दर्शवला. विराट स्वत: या परिस्थितीला सामोरे गेला आहे त्यामुळे त्याने आपल्या अनुभवातून सिराजला प्रोत्साहन दिले. कर्णधार कोहलीने 'बळकट' होण्याच्या सल्ल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खडतर मालिकेच्या तयारीत त्याला खूप मदत झाली, असे सिराज म्हणाला. 27 नोव्हेंबर रोजी वनडे मालिकेसह भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात होईल. एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही संघात टी-20 आणि अखेरीस बहुप्रतीक्षित कसोटी मालिका खेळली जाईल. या मालिकेतील पहिला सामना गुलाबी चेंडूने म्हणजेच दिवस/रात्र सामना असेल. (Mohammed Siraj’s Father Passes Away: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात निवड झालेल्या मोहम्मद सिराज याच्या वडिलांचे निधन)
बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये भावुक सिराज आपल्या वडिलांबद्दल बोलताना म्हणाला, “वडिलांचा हात आता माझ्या डोक्यावर नाही, पण मी आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळेन. वडिलांचे निघून जाणे हे माझ्यासाठी सर्वात मोठे नुकसान आहे.” दुःखाच्या क्षणी ऑस्ट्रेलियामध्ये सहकाऱ्यांनी देखील धीर देऊन मनोबल वाढवले असल्याचं सिराजला यावेळी म्हटलं. तो म्हणाला विराटच्या सकारात्मक शब्दांनी त्याला बळ मिळाले, “मियाँ तणाव घेऊ नको, मनाने मजबूत रहा. तुझ्या वडिलांचे स्वप्न होते की तुम्ही भारताकडून खेळावे आणि आता तू ते पूर्ण कर.” सिराज पुढे म्हणाला की, “जर या परिस्थितीत तू खंबीर राहिलास, तर ते तुझ्यासाठी खूप चांगले असेल. विराटचे हे शब्द खूप सकारात्मक होते.”
विशेष म्हणजे व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडताना कोहलीलाही वैयक्तिक शोकांतिकेचा सामना करावा लागला आहे. 2007 मध्ये रणजी करंडक सामन्यात कोहलीच्या वडिलांचा मृत्यू झाला होता, मात्र दुसऱ्या दिवशी तो मैदानात परतला आणि त्याने दिल्लीसाठी 97 धावांची शानदार खेळी केली. दरम्यान, सिराजच्या वडिलांच्या मृत्यूनंतर बीसीसीआयने गोलंदाजाला भारतात परतण्याचा पर्याय दिला होता, पण आपल्या दुःखावर देशाची निवड केली.