न्यूझीलंडमध्ये गैरवर्तन केल्या प्रकरणी विराट कोहली याचा बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी केला बचाव, पाहा काय म्हणाले

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचे बालपण प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी नुकत्याच संपुष्टात आलेल्या न्यूझीलंड दौऱ्याच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानावरील वागणुकीचा बचाव केला आणि म्हटले की, त्याने कधीही आक्रमकता आणि गैरव्यवहार दरम्यानची रेखा ओलांडली नाही.

विराट कोहली (Photo Credit: Twitter)

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे बालपण प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनी नुकत्याच संपुष्टात आलेल्या न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्याच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानावरील वागणुकीचा बचाव केला आणि म्हटले की, त्याने कधीही आक्रमकता आणि गैरव्यवहार दरम्यानची रेखा ओलांडली नाही. क्राइस्टचर्च (Christchurch) कसोटी सामन्यादरम्यान एक क्षण असा आला होता जेव्हा टीम इंडियाचा पराभव निश्चित वाटत होता. न्यूझीलंडचा संघ वर्चस्व गाजवत होता. दरम्यान, जेव्हा मोहम्मदशमी ने टॉम लाथमला बाद करून पार्टीचा रस्ता दाखविला, तेव्हा कर्णधार कोहली इतका उत्साहित झाला की त्याने स्थानिक प्रेक्षकांकडे पाहून गप्प राहण्याचा इशारा करून शिवीगाळ केली. याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. विराटचे असे वर्तन सध्या चर्चेचा विषय बनले आहे. यावर कोहलीचे बालपण प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी त्याच्या मैदानावरील वर्तनाचा बचाव केला आहे. (Video: न्यूझीलंडमध्ये प्रेक्षकांसह आक्रामक वागणुकीवर पत्रकारने विचारला प्रश्न, संतप्त विराट कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया)

राजकुमार शर्मा म्हणाले, "जेव्हा तो चांगली कामगिरी करतो तेव्हा तो देशासाठीच्या या आक्रमकतेची प्रशंसा करतात. आक्रमकता ही त्यांची मजबूत बाजू असल्याचा माझा विश्वास आहे. परंतु आक्रमकता आणि उद्धटपणा यांच्यात एक ओळ आहे. त्याने ती ओळ कधीच ओलांडली नाही. आक्रमकता त्याला उत्कृष्ट कामगिरी करण्यास प्रेरित करते." न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट मालिकेत कोहलीने अत्यंत खराब कामगिरी केली. त्याने 4 डावात फक्त 38 धावा केल्या. शिवाय पूर्ण किवी दौऱ्यात त्याने 218 धावा केल्या.

विराटच्या या कामगिरीवर त्याचा प्रशिक्षक शर्मा म्हणाले, "प्रत्येक खेळाडू खराब टप्प्यातून जातो. काळजी करण्याची काहीच गोष्ट नाही. तो एक चांगला खेळाडू आहे आणि काय चूक होत आहे हे त्याला माहित आहे. आम्ही याबद्दल बोललो आहोत. तो लवकरच फॉर्ममाडे परत येईल.'' टीम इंडियाने न्यूझीलंड दौऱ्याची जोरदार सुरूवात केली आणि टी-20 मालिकेत यजमान संघाविरुद्ध पहिल्या क्लीन स्वीप नोंदवला, पण किवी टीमने वनडे मालिकेत पुनरागमन केले आणि भारताविरुद्ध क्लीन स्वीप मिळवला.