Virat Kohli vs BCCI Row: विराट कोहली ODI कॅप्टन्सी विवादात रवी शास्त्री यांची उडी, म्हणाले- ‘सौरव गांगुलीने आपली बाजू मांडावी’
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराट दोघांनीही पत्रकारांसमोर परस्परविरोधी विधाने केली आहेत. आता माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील या विवादात उडी घेतली आहेत आणि गांगुलीला आपली बाजू स्पष्ट करण्याचा सल्ला दिला.
Virat Kohli vs BCCI Row: दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी (South Africa Tour) अखिल भारतीय निवड समितीने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून भारतीय कर्णधार पदावरून हकालपट्टी केल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध बीसीसीआय (BCCI) वादाची सुरुवात झाली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराट दोघांनीही पत्रकारांसमोर परस्परविरोधी विधाने केली आहेत, ज्यामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी वादळी पार्श्वभूमी निर्माण झाली आहे. आता माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी देखील या विवादात उडी घेतली आहेत आणि गांगुलीला आपली बाजू स्पष्ट करावी लागेल व त्याच्या घटनांच्या आवृत्तीवर बोलावे लागेल असे मत व्यक्त केले आहे. शास्त्री म्हणाले की टीम इंडियाच्या वनडे कर्णधारपदाच्या मुद्द्याला गाडण्याची वेळ आली आहे आणि कोहलीने आपली बाजू सांगितली असताना, आता सौरव गांगुलीची आपली बाजू स्पष्ट करण्याची आणि भारतीय क्रिकेटला काही काळापासून वेढलेल्या या मुद्द्यातुन बाहेर काढण्याची वेळ आली आहे. (Ravi Shastri on R Ashwin: ‘सगळ्यांना खूश ठेवणं माझं काम नाही...’ अश्विनच्या आरोपांवर माजी प्रशिक्षक शास्त्रींनी मारला टोला)
“विराटने त्याच्या कथेची बाजू मांडली आहे. बोर्डाच्या अध्यक्षांनी आपली बाजू मांडणे आवश्यक आहे. कोण खोटे बोलत आहे आणि कोण नाही याचा मुद्दा नाही. वास्तविक संभाषण काय होते हे कळेपर्यंत तिथे जाणे योग्य नाही. चांगल्या संवादामुळे परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आली असती,” शास्त्री यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले. भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करत असताना कोहली विरुद्ध बीसीसीआय वादाची चर्चा रंगली आहे. कसोटीत संघाचे नेतृत्व करणारा कोहली आफ्रिकी देशात सुरू होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीसह भारताच्या पहिल्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सज्ज असेल.
शास्त्री यांनी विराट कोहलीसोबतच्या नातेसंबंधांबद्दल पुढे सांगितले आणि आज जगातील सर्वोत्तम कसोटी कर्णधार म्हणून त्याचे कौतुक केले. व्हाईट-बॉल कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नियुक्तीचेही त्याने समर्थन केले. “विराटने एकदा सांगितले की, मला टी-20 चे नेतृत्व करायचे नाही, तेव्हा ते रोहितसाठी दार खुले झाले. तो व्हाईट-बॉलचा कर्णधार असावा. रोहित शर्मा आता टी-20 चा कर्णधार आहे. तो व्हाईट बॉलचा कर्णधार असावा.”