Virat Kohli Fitness Regime: विराट कोहलीने फिटनेस नियम पाळताना सांगितली आईची चिंता, 'या' कारणामुळे होती नाखूष (Watch Video)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली नेहमीच आपल्या तंदुरुस्तीबाबत जागरूक असतो. रंतु एका वेळी त्याच्या आईला तो अशक्त आहे आणि कदाचित आजारी पडत आहे असे वाटत होते. कोहलीने म्हटले आहे की आईला आपण आजारी नाही हे पटवून देणे खरोखर कठीण होते, परंतु खेळासाठी आपला तंदुरुस्ती कायम राखणे कठीण होते.

विराट कोहलीने फिटनेस नियम पाळताना सांगितली आईची चिंता (Photo Credit: Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नेहमीच आपल्या तंदुरुस्तीबाबत जागरूक असतो. जगभरातील क्रिकेटपटू त्यांच्या फिटनेसचे कौतुक करतात. तो मैदानावर वेगवान फिल्डर्सपैकी एक आहे. त्याने नेहमीच शरीराला आकारात ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु एका वेळी त्याच्या आईला तो अशक्त आहे आणि कदाचित आजारी पडत आहे असे वाटत होते. कोहलीने म्हटले आहे की आईला (Virat Kohli Mother) आपण आजारी नाही हे पटवून देणे खरोखर कठीण होते, परंतु खेळासाठी आपला तंदुरुस्ती कायम राखणे कठीण होते. भारतीय कसोटी सलामीवीर मयंक अग्रवाल यांच्यासमवेत 'ओपन नेट्स विथ मयंक' (Open Nets With Mayank) नावाच्या बीसीसीआयच्या (BCCI) चॅट शो दरम्यान कोहलीने हे सांगितले. हा कार्यक्रम लवकरच बीसीसीआय टीव्हीवर प्रसारित केला जाईल. बीसीसीआयने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला, त्यामध्ये कोहलीने म्हटले की, "माझी आई म्हणायची की मी अशक्त होत आहे." (विराट कोहलीचा नवा ‘रेट्रो’ लूक पाहून चाहते इम्प्रेस; 'रईस'च्या शाहरुख खानपासून Money Heistच्या प्राध्यापकाशी केली तुलना)

कोहलीने तंदुरुस्तीची नव्याने व्याख्या केली आहे. त्याने मिळवलेल्या फिटनेसची पातळी आता कोणत्याही युवा क्रिकेटपटूची व्यावसायिक आवश्यकता बनली आहे. बीसीसीआयने 1:05 मिनिटाचा व्हिडिओ कॅप्शन दिले: "विराट कोहलीने जेव्हा फिटनेस नियम सुरू केले तेव्हा त्याच्या आईच्या मनात काय होते ते ऐका." मयंकने विराटला विचारले की आपल्या नवीन फिटनेस आहाराबद्दल त्याची आई किंवा कुटूंबातील कोणत्याही सदस्याशी त्यांचे संभाषण आठवते का? "माझी आई मला सांगायची की मी अशक्त होत आहे. मला वाटते की कोणत्याही आईचे असे म्हणणे अगदी नियमित गोष्ट आहे," कोहलीने मयंकला सांगितले. "तू खूप कामजोर झाला आहे, तू काही खात नाही," कोहलीची आई त्याच्या नवीन फिटनेसविषयी चिंतित होती.

“तुम्ही (खेळत) असलेल्या खेळाविषयी काळजी घेणे आणि व्यावसायिक असणे यातला फरक त्यांना (आईंना) समजत नाही. त्यांच्यासाठी, जर मुल गुबगुबीत दिसत नसेल तर त्याच्यात काहीतरी गडबड आहे!” भारतीय कर्णधार मजेदारपणे म्हणाला. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या 'ओपन नेट्स विथ मयंक' या नव्या पर्वाचा टीजरमध्ये कोहली एका नवीन रूपात दिसला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now