IPL Auction 2025 Live

भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि BCCI कडून विंग कमांडरच्या शौर्याला 'या' पद्धतीने दिली सलामी

तसेच विंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्याला आपल्या आपल्या पद्धतीने सलामी देत आहे.

भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि BCCI कडून विंग कमांडरच्या शौर्याला 'या' पद्धतीने दिली सलामी (Photo Credits-Twitter)

भारतीय वायुसेना (Indian Air Force) विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) यांची शुक्रवारी पाकिस्तानच्या ताब्यातून सुखरुप सुटका करण्यात आली. त्यामुळे भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच विंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्याला आपल्या आपल्या पद्धतीने सलामी देत आहे. तसेच भारतीय क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि बीसीसीआयने (BCCI) ही ट्वीट करुन अभिनंदन आपल्या मायदेशात आल्याने आनंद व्यक्त केला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने अभिनंदन यांचे कौतुक केले आहे. तसेच ट्वीट करुन असे लिहिले आहे की, 'तुच खरा हीरो, तुझ्यासमोर खाली वाकून तुला सलाम करतो'. जय हिंद असे म्हटले आहे.

तर बीसीसीआयने असे म्हटले आहे की, तुम्ही हवेत राज्य करता आणि आमच्यावर ही. तुमची हिंम्मत येणाऱ्या पिढीला प्रोत्साहन देणारी ठरणार आहे.

विराट व्यतिरिक्त गौतम गंभीरने (Gautam Gambhir) त्याच्या ट्वीटमध्ये असे लिहिले की, अभिनंदन यांचे भारतात येण्यापूर्वी मी नाराज होते. मात्र भारतात आल्यानंतर भुमीपुत्र पुन्हा मायदेशात आल्याने आनंदित झालो असल्याचे म्हटले आहे.

त्याचसोबत विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)  याने ही ट्वीटच्या माध्यमातून अभिनंदन ह्याचे एक चित्र पोस्ट करुन त्याच्या शौर्याला समाली दिली आहे.

भारतीय वायुसेना (Indian Air Force) विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Varthaman) शुक्रवारी (1मार्च) रोजी पाकिस्तान (Pakistan) मधून अटारी वाघा बॉर्डरद्वारे भारतात (India) सुखरुप परतले.तर पाकिस्तानने मिग-21 हे विमानावर हल्ला केल्याने त्याचा अपघात झाला होता.मात्र भारताने पाकिस्तानचे एफ-16 हे विमान उद्ध्वस्त करुन लावले होते.