Virat Kohli On Australian Newspaper's Front Page: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांमध्ये विराट कोहली चर्चेत, पहिल्या पानावर मोठा फोटो तर हिंदी-पंजाबीमध्ये दिसली हेडलाइन
ऑस्ट्रेलियातील अनेक वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर विराट कोहलीचा फोटो लावला आहे.
Australia National Cricket Team vs India National Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यासाठी जवळपास 10 दिवस बाकी आहेत, पण ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये विराट कोहलीची (Virat Kohli) जादू शिगेला पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियातील अनेक वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर विराट कोहलीचा फोटो लावला आहे. याशिवाय अनेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला दाखवण्यात आले आहे. तसंच या चित्रांची खास गोष्ट म्हणजे इंग्रजीशिवाय पहिल्या पानावरची हेडलाइन हिंदी आणि पंजाबी भाषेत आहे. (हे देखील वाचा: Mohammed Shami Comeback: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी मोहम्मद शमी तंदुरुस्त, वर्षभरानंतर 'या' दिवशी खेळणार पहिला सामना)
यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत आले दिसून
वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर विराट कोहलीचा फोटो ठळकपणे दाखवण्यात आला आहे. याशिवाय या वृत्तपत्रांनी यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांना पहिल्या पानावर प्रसिद्ध केले आहे. तसेच, ते हिंदीमध्ये लिहिले आहे - युगांची लढाई... तर, यशस्वी जैस्वालच्या फोटोसह पंजाबीमध्ये लिहिले आहे - नवम राजा... (नवा राजा). ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांची फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया यूजर्स या फोटोंवर सातत्याने कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.
स्थानिक पत्रकारही आश्चर्यचकित
पहिल्या पानांवर भारतीय खेळाडूंची फोटो आणि ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांमध्ये हिंदीचा वापर झाल्यानंतर स्थानिक पत्रकारही आश्चर्यचकित झाले आहेत. नुकतेच पाकिस्तानचे एकदिवसीय आणि टी-20 प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांनी ऑस्ट्रेलियन मीडियावर आपला राग काढला होता. जेसन गिलेस्पीने आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, सध्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये टी-20 सामना खेळला जात आहे, परंतु ऑस्ट्रेलियन मीडिया पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेऐवजी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे.