विराट कोहली, एमएस धोनी यांच्यासह भारतीय संघातील खेळांडूचा भगव्या जर्सी मधील फोटो शूटचा व्हिडिओ व्हायरल (Video)

विराट कोहली (Virat Kohli), एमएस धोनी MS Dhoni), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यासह अन्य भारतीय खेळाडूंनी भगव्या रंगातील जर्सीमधील फोटो शूटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Indian Cricketer (Photo Credits-Instagram/ @ICC)

विराट कोहली (Virat Kohli), एमएस धोनी MS Dhoni), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यासह अन्य भारतीय खेळाडूंनी भगव्या रंगातील जर्सीमधील फोटो शूटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तर रविवारी आईसीसी वर्ल्ड कप 2019 साठी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये लढत रंगणार आहे. याच पार्श्वभुमीवर आईसीसीकडून खेळाडूंच्या फोटो शूटचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रिषभ पंत, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक, केदार जाधव, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल आणि एमएस धोनी या भगव्या जर्सीमध्ये दिसून येत आहेत.(30 जून रोजी पहिल्यांदाच भारतीय संघ खेळेल भगव्या जर्सी मध्ये; Nike आणि BCCI ने केले 'या' डिझाईन वर शिक्कामोर्तब Photos)

बीसीसीआयने भगव्या रंगावरच शिक्कामोर्तब केले आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचे अधिकृत पोशाख प्रायोजक, नाईकी (Nike) यांनीदेखील रविवारी इंग्लंडविरुद्ध आयसीसी विश्वचषक सामन्यासाठी भारतीय संघ नारंगी आणि निळ्या जर्सीमध्ये खेळत असल्याची पुष्टी दिली आहे. दरम्यान सध्या वर्ल्डकपमध्ये 10 संघांनी भाग घेतला आहे, यातील 8 संघ हे दोन रंगाच्या जर्सीमध्ये खेळत आहेत. त्यात आता भारतीय संघही सामील होईल.



संबंधित बातम्या

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

Australia vs India 3rd Test 2024: यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर निराश सुनील गावस्कर म्हणाले- क्रीजवर टिकून राहण्याचा प्रयत्न करणे तुमचे काम आहे.

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

ICC Champions Trophy 2025: आयसीसी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून होणार सुरू, संपूर्ण वेळापत्रक आज होईल जाहीर