Video: न्यूझीलंडमध्ये प्रेक्षकांसह आक्रामक वागणुकीवर पत्रकारने विचारला प्रश्न, संतप्त विराट कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया
मात्र, सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली माध्यमांशी बोलताना एका प्रश्नावर चांगलाच संतापला आणि त्याने या पत्रकाराची क्लास घेतली. सामन्याच्या दुसर्या दिवशी विराटने न्यूझीलंडचा फलंदाज बाद झाल्यावर आक्रमकता दाखवली जी कॅमेर्यावर रेकॉर्ड झाली.
भारताचा न्यूझीलंड (India's New Zealand Tour) दौरा संपुष्टात आला आहे. न्यूझीलंडने दुसरा सामना 7 विकेटने जिंकला आणि भारताचा 2-0 ने क्लीन स्वीप केला. मात्र, सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) माध्यमांशी बोलताना एका प्रश्नावर चांगलाच संतापला आणि त्याने या पत्रकाराची क्लास घेतली. सामन्याच्या दुसर्या दिवशी विराटने न्यूझीलंडचा फलंदाज बाद झाल्यावर आक्रमकता दाखवली जी कॅमेर्यावर रेकॉर्ड झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला आहे. यासंदर्भात एका पत्रकाराने विराटने एक प्रश्नही विचारला, जो कोहलीला अजिबात पसंत पडला नाही आणि त्याने संपूर्ण गोष्टी जाणून घेतल्याशिवाय कोणताही प्रश्न विचारू नका असे स्पष्ट केले. न्यूझीलंडचा दौरा कोहलीसाठी एक भयानक स्वप्न ठरला. कसोटी मालिकेच्या 4 डावात तो फक्त 38 धावा करू शकला. यामुळे त्याच्यावर सध्या टीका केली जात आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाला पहिल्यांदा क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. (IND vs NZ 2nd Test: क्राइस्टचर्च मॅच दरम्यान आक्रमक झाला विराट कोहली, प्रेक्षकाकडे बघून दिली संतापजनक प्रतिक्रिया Video)
क्रिकबझने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार पत्रकाराने कोहलीला विचारले की, "विराट, मैदानावरील तुमच्या वर्तनाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे, केन विल्यमसन (Kane Williamson) आऊट झाल्यावर, प्रेक्षकांकडे बघून केलेल्या वर्तनाबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे? भारतीय कर्णधार म्हणून, तुम्हाला असे वाटत नाही की आपण मैदानावर यापेक्षा चांगले उदाहरण उभे केले पाहिजे?" यावर कोहली भडकला आणि म्हणाला, "आपल्याला नक्की काय घडले हे शोधून चांगले प्रश्न घेऊन येणे आवश्यक आहे. अर्ध्या प्रश्नांसह किंवा घडलेल्या अर्ध्या तपशीलांसह आपण येथे येऊ शकत नाही. आणि तसेच, जर आपणास विवाद निर्माण करायचा असेल तर, ही योग्य जागा नाही. मी मॅच रेफरीशी बोललो आणि जे घडले त्यावर त्यांना काहीच हरकत नव्हती. धन्यवाद."
दरम्यान, संपूर्ण दौर्यामध्ये तो एकदाच 50 चा आकडा पार करू शकला. कसोटी मालिकेत कोहलीला एकदाही 20 धावा करता आल्या नाहीत. या पराभवामुळे भारताला दुहेरी धक्का बसला आहे, आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपमधील हा भारताचा सलग दुसरा पराभव आहे आणि या मालिकेतून त्यांना एकही गुण मिळवता आला नाही. न्यूझीलंडने या मालिकेतून 120 गुण मिळवले आणि आता त्यांचे एकूण 180 गुण झाले आहेत. भारत अद्याप 360 गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे.