Global Instagram Influencersच्या पहिल्या 25 मध्ये भारतीयांच्या यादीत विराट कोहली-अनुष्का शर्मा यांना स्थान, 'हा' जागतिक स्टार आहे नंबर 1
अलीकडेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पहिल्या 25 जागतिक इन्स्टाग्राम प्रभावकच्या यादीत तो सर्वोच्च स्थान मिळवले. या यादीत पहिल्या स्थानावर प्रसिद्ध फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो आहे तर पंतप्रधान मोदींनी 17वे स्थान मिळविले आहे. या यादीत विराटची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचाही समवेश असून तिने 24वे स्थं मिळाले आहेत.
Global Instagram Influencers List: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रमांसाठी समानार्थी आहे. 2008 मध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केल्यापासून, 32 वर्षीय विराटने फलंदाज म्हणून अनेक टप्पे गाठले आहेत आणि 2017 च्या सुरुवातीला कोहलीला कर्णधारपद सोपवण्यात आले होते. तो आधुनिक काळातील सर्वात प्रभावी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेटचा (Indian Cricket) पोस्टर बॉय आहे. अलीकडेच कोहलीने आणखी एक मोठी कामगिरी केली. पहिल्या 25 जागतिक इन्स्टाग्राम प्रभावकच्या यादीत तो सर्वोच्च क्रमांकाचा भारतीय आहे. Hype Auditorने ही यादी संकलित केली आहे. या अहवालात अव्वल 1000 इन्स्टाग्राम अकाउंट्सना रँक करण्यात आले आहेत, जे सेलिब्रेटी जागरूकता, सशक्तीकरण, लोकांना त्यांच्या आवाज, प्रेरणा आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपस्थिती या गोष्टींवर काय परिणाम करतात यावर आधारित आहे.
या यादीत पहिल्या स्थानावर प्रसिद्ध फुटबॉल स्टार क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आहे, ज्याच्या प्रत्येक पोस्टवर 4.5 लाख एंगेजमेंट असल्याचे आढळले. या यादीमध्ये कोहली 11व्या स्थानावर असून त्याच्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी 17वे स्थान मिळविले आहे. मोदींच्या प्रत्येक पोस्टसाठी 2.6 दशलक्ष गुंतवणूकी नोंदवल्या गेल्या. या यादीत विराटची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचाही (Anushka Sharma) समवेश असून तिने 24वे स्थं मिळाले आहेत.
दुसरीकडे, बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि दीपिका पादुकोण या दोन अन्य भारतीय सेलिब्रिटी आहेत ज्यांनी पहिल्या-50 यादीत स्थान मिळवले आहे. त्या अनुक्रमे 43व्या आणि 49व्या स्थानावर आहेत. विरुष्काबद्दल बोलायचे तर क्रिकेट-बॉलीवूडचं हे प्रसिद्ध जोडपं 2021 मध्ये आपापल्या आयुष्यात लवकरच नवीन पाहुण्यांचे स्वागत करणार आहेत. अनुष्का शर्मा सध्या मुंबईच्य आपल्या घरी असून कोहली ऑस्ट्रेलियामध्ये आहे. विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 डिसेंबर रोजी पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर भारतात परतला आहे. अलीकडेच या जोडप्याने लग्नाचा तिसरा वाढदिवशी साजरा केला. क्रिकेट-बॉलीवूडच्या या जोडप्याने 2017च्या उत्तरार्धात इटली येथे आयोजित खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली.
(The above story first appeared on LatestLY on Dec 13, 2020 12:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

