Virat Kohli-Anushka Sharma announce Pregnancy: विराट कोहली-अनुष्का शर्माच्या घरी हलणार पाळणा, फोटो शेअर करत चाहत्यांसह शेअर केली 'गुड-न्यूज'
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. विराटने अनुष्कासोबतच एक फोटो सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवर टाकला आणि चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली. "आणि मग, आम्ही तीन होतो! 2021 जानेवारीला आगमन" अशा कॅप्शनसह विराटने ट्विटरवर अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. विराटने अनुष्कासोबतच एक फोटो सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवर टाकला आणि चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली. "आणि मग, आम्ही दोनचे तीन झालोय! 2021 जानेवारीला आगमन" अशा कॅप्शनसह विराटने ट्विटरवर अनुष्कासोबतचा फोटो शेअर केला. विराट सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) भाग घेण्यासाठी संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे तर अनुष्का शर्मा मुंबईत आहेत. विराट आणि अनुष्काने डिसेंबर 2017 मध्ये लग्न केले. यापूर्वी, इन्स्टाग्रामवर फुटबॉल स्टार सुनील छेत्री याच्याबरोबर लाइव्हमध्ये विराटने कधीही अनुष्काला औपचारिकपणे प्रस्ताव दिला नसल्याचे काबुल केले. विराट म्हणाला, “अनुष्काने जे सांगितले ते पूर्णपणे सत्य आहे, आम्हाला तसे करण्याची गरज कधीच वाटली नाही, आम्हाला माहित आहे की आम्ही एकमेकांशी लग्न करणार आहोत, याबद्दल कधीही शंका नव्हती. म्हणून एकदा आम्हाला माहित झाले की सर्वकाही सुरळीत चालू आहे, आम्ही एकत्र एकत्र आपले जीवन जगण्यास उत्सुक होतो. आणि आपणुन गोष्टी चालूच राहिल्या.” (Virat kohli Turns Hotel Balcony into Gym: विराट कोहलीने हॉटेलच्या बाल्कनीचे Gym मध्ये केले रूपांतर, RCBने दाखवली क्वारंटाइनमध्ये कर्णधाराच्या फिटनेस रिजिमची झलक Watch Video)
विराटने शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुष्काचा बेबी बंप दिसत आहे. ही गुड-न्यूज शेअर करताना अनुष्कानेही विराटप्रमाणे ट्विट केले. लॉकडाऊनमध्ये अनुष्का-विराट एकत्र एकत्रितपणे दर्जेदार वेळ घालवताना दिसले आणि सोशल मीडियावरही याबद्दल पोस्ट केले. दोघे वरळी, मुंबई येथील त्यांच्या अपार्टमेंटच्या बाल्कनीमध्ये क्रिकेट खेळतात किंवा एकत्र फिरतात, किंवा इन्स्टाग्राम क्विज खेळतानाही दिसले. दरम्यान, या महिन्यात बॉलिवूडमधील ही दुसरी घोषणा आहे. यापूर्वी, करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी काही आठवड्यांपूर्वी दुसऱ्या बाळाची घोषणा केली. करीना आणि सैफ हे 3 वर्षीय मुलगा तैमूरचे पालक आहेत.
विराटचे ट्विट
‘झिरो’ सिनेमा रिलीज झाल्यानंतर अनुष्काने अभिनयातून ब्रेक घेतला. या चित्रपटात तिच्या सोबत शाहरुख खान आणि कतरीना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसले.‘झिरो’च्या रिलीज नंतर अनुष्का विराटबरोबर वेळ घालवत आहे आणि तिच्या प्रॉडक्शन कंपनीवर लक्ष केंद्रित करत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)