Virat Kohli Visit Vrindavan Dham with Family: प्रेमानंद महाराजांच्या भेटीसाठी पोहोचले विराट-अनुष्का; मुले अकाय-वामिका यांचे फोटो व्हायरल
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी शुक्रवारी प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले. यादरम्यान त्यांची मुलगी वामिका आणि मुलगा अकाय हे देखील त्यांच्यासोबत दिसले. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Virat Kohli Visit Vrindavan Dham with Family: विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा यांनी शुक्रवारी प्रेमानंद महाराजांचे (Premanand Maharaj)दर्शन घेतले. यादरम्यान त्यांची मुलगी वामिका(Vamika) आणि मुलगा अकाय (Akaay)हे देखील त्यांच्यासोबत दिसले. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, अनुष्का (Anushka Sharma)आणि विराट प्रेमानंद गोविंद महाराज यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. एवढेच नाही तर महाराजांसमोर पोहोचताच दोघांनीही त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्यांच्याशी संवाद साधला. यानंतर अनुष्का शर्मा प्रेमानंद जी महाराजांना प्रश्न विचारतानाही दिसली. (Virat Kohli and Anushka Sharma at Krishna Das Kirtan: न्यूझीलंडकडून पराभवानंतर विराट कोहली पोहचला कीर्तनला, पत्नी अनुष्का शर्माने घेतला गाण्यांचा आनंद - Watch Video)
अनुष्का शर्मा प्रेमानंद महाराजांना प्रश्न विचारतानाही दिसली
व्हिडीओमध्ये, “गेल्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा माझ्या मनात बरेच प्रश्न होते. मला वाटले मी ते विचारावे, पण तिथे बसलेल्या प्रत्येकानेही असेच काही प्रश्न विचारले होते. आणि जेव्हा आम्ही तुमच्या घरी येण्याचा विचार करत होतो, तेव्हा मी माझ्या मनात तुमच्याशी बोलत होते. दुसऱ्या दिवशी कोणीतरी तुम्हाला तो प्रश्न विचारला. या दरम्यान, अनुष्का महाराजांना सांगते, "तुम्ही मला फक्त प्रेम द्या.". यावर स्वामीजी म्हणतात की 'त्यांना आनंद आहे की त्यांच्या कारकिर्दीत इतक्या उंचीवर पोहोचल्यानंतरही, दोघेही अजूनही देवाच्या भक्तीत मग्न आहेत.'
प्रेमानंद महाराजांच्या भेटीसाठी पोहोचले विराट-अनुष्का
विराट आणि अनुष्काचे कौतुक
प्रेमानंद महाराजांनीही विराट आणि अनुष्काचे कौतुक केले. ते म्हणाले, “हे लोक खूप धाडसी आहेत. या जगात कीर्ती आणि सन्मान मिळवल्यानंतर भक्तीकडे वळणे खूप कठीण आहे. जर तुम्ही नामजपाचा सराव केला तर तुम्हाला सांसारिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रगती मिळेल. देवावर अवलंबून राहा, देवाचे नाव घ्या आणि भरपूर प्रेमाने आनंदाने जगा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)