Amit Mishra: गर्लफ्रेंडला डेटवर घेऊन जाण्यासाठी चाहत्याने मागितले 300 रुपये; क्रिकेटपटू अमित मिश्रा याच्याकडून तातडीने प्रतिसाद
विशेष म्हणजे चाहत्याच्या विनंतीची तातडीने दखल घेत अमित मिश्रा याने ट्विटर युजर्सच्या बँक खात्यात चक्क INR 500 हस्तांतरित करून प्रतिसाद दिला. मिश्रा यांनी लिहिले, "झाले, तुमच्या भेटीसाठी शुभेच्छा.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) फ्रँचायझीसह अतुलनीय कामगिरीनंतर भारतीय फिरकी गोलंदाज अमित मिश्रा (Amit Mishra) सोशल मीडियावर सध्या अधिक सक्रीय झाला आहे. तसा तो पूर्वीपासूनच सक्रीय असतो. पण, अलिकडे ही सक्रीयता अधिक वाढली आहे इतकेच. त्यामुळे त्याच्या चाहत्यांकडूनही त्याला अनेकदा मजेशीर प्रश्न विचारले जातात. ज्याती तो उत्तरेही भन्नाट देतो कधीकधी. मायक्रोब्लॉगिंग साइटवर (Twitter) अशाच एका चाहत्याकडून एक अमित मिश्रा याला काहीसी विचित्रच विनंती करण्यात आली. यावरही त्याने अशीच भन्नाट प्रतिक्रिया दिली.
महागाईच्या काळात रोख रकमेचा तुटवडा असलेल्या एका चाहत्याने अमित मिश्रायाला ऑनलाइन ट्रान्सफर म्हणून INR 300 पाठवण्याची विनंती केली. या चाहत्याला त्याच्या मैत्रिणीला बाहेर फिरायला घेऊन जायचे होते. ट्विटर युजर असलेल्या या चाहत्याने मिश्रा यांच्याशी संपर्क साधला आणि माजी डीसी स्टारला त्याचे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) तपशील शेअर करून रक्कम हस्तांतरित करण्यास सांगितले. (हेही वाचा, Breakup & Success Story:'लठ्ठ बॉयफ्रेंड नको गं बाई' म्हणत Girlfriend ने केले ब्रेकअप; इरेला पेटलेल्या तरुणाने घेतले मनावर, बनला अनेकींचा क्रश)
विशेष म्हणजे चाहत्याच्या विनंतीची तातडीने दखल घेत अमित मिश्रा याने ट्विटर युजर्सच्या बँक खात्यात चक्क INR 500 हस्तांतरित करून प्रतिसाद दिला. मिश्रा यांनी लिहिले, "झाले, तुमच्या भेटीसाठी शुभेच्छा. मिश्रा यांनी या व्यवहाराचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. दिग्गज क्रिकेटपटूच्या चाहत्यांमध्ये आणि अनुयायांमध्ये हा मजेशीर संवाद लगेचच लोकप्रिय आणि व्हायरलही झाला.
ट्विट
अमित मिश्रा हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा तिसरा फिरकी गोलंदाज आहे. मिश्राने जगातील सर्वात श्रीमंत T20 लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) चे प्रतिनिधित्व केले आहे. स्टार फिरकीपटूने 2008 मध्ये सवाई मानसिंग स्टेडियमवर माजी चॅम्पियन राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध आयपीएल पदार्पण केले. मिश्रा हा एकमेव गोलंदाज आहे ज्याने आयपीएलमध्ये 3 हॅटट्रिक घेतली आहे. शास्त्रीय फिरकीपटूने भारतासाठी 22 कसोटी, 36 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) आणि 10 T20 खेळले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)