ICC World Cup 2019: विजय शंकरचा खुलासा, पाकिस्तानविरुद्ध वर्ल्ड कप सामन्यापूर्वी  पाक चाहत्यांनी भारतीय खेळाडूंसाठी वापरले अपशब्द, जाणून घ्या 'तो' किस्सा

पाकिस्तानविरुद्ध सामन्यातून विजय शंकरने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

विजय शंकर, भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप 2019 (Photo Credit: Getty)

भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट संघात द्विपक्षीय मालिका मागील 8 वर्षांपासून रद्द झाली असली तरी दोन्ही टीम आयसीसी (ICC) आयोजित स्पर्धांमध्ये आमने-सामने येत असताना. दोन्ही टीम अखेरीस 2019 इंग्लंडमध्ये आयोजित वनडे वर्ल्ड कप (ODI World Cup) स्पर्धेत सातव्यांदा आमने-सामने आले होते आणि टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध आपला रेकॉर्ड कायम ठेवत सातवा विजय नोंदवला. भारत-पाकिस्तानमध्ये वर्ल्ड कप सामन्यांमध्ये भारतीय टीम एकदाही पराभूत झालेली नाही. दोन्ही टीममधील हा सामना मॅन्चेस्टरमध्ये खेळला गेला, पण त्या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंना वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले ज्याचा खुलासा अष्टपैलू विजय शंकरने (Vijay Shankar) नुकताच केला. पाकिस्तानविरुद्ध सामन्यातून विजय शंकरने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्याच चेंडूवर विकेट घेत विजयने ऐतिहासिक कामगिरी केली. ('भारत-पाकिस्तान संघांमध्ये क्रिकेट सामने न होऊ देणं लज्जास्पद', माजी पाक कर्णधार शोएब मलिकने मांडले मत)

नुकतच भारत आर्मीच्या पॉडकास्टवर बोलताना शंकर म्हणाला की, पाकिस्तान सामन्यापूर्वी एक दिवस आधी आपण इलेव्हनमध्ये सहभागी होणार असल्याचे टीम मॅनेजमेंटने मला सांगितले होते. त्यानंतर त्याने सांगितले की, भारत-पाकिस्तान स्पर्धेचा अनुभव आला जेव्हा त्याच दिवशी एका कॉफी शॉपवर काही खेळाडूच्या चाहत्यांनी अपशब्द वापरले. “त्या सामन्याआधी मी संघातील काही खेळाडूंसोबत कॉफीसाठी बाहेर गेलो. तेव्हा तेथे काही पाकिस्तानी चाहते आमच्याकडे आले आणि आमच्यावर अक्षरशः शिवीगाळ केली. भारत-पाकिस्तान खेळाचा हा माझा पहिला अनुभव होता.”

“आम्ही काहीच बोललो नाही. ते अपशब्द वापरात होते आणि आम्ही सर्व रेकॉर्ड केलं. ते काय करत आहे हे आम्ही फक्त बसून पाहत होतो,” विजय म्हणाला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शंकरने पहिल्याच चेंडूवर इमाम उल हकची विकेट घेतली. त्याने 5.2 ओव्हरमध्ये 22 धावांवर 2 गडी बाद केले. शंकरला भारतीय संघात दुखापत झालेल्या शिखर धवनच्या जागी खेळण्याची संधी मिळाली होती. 16 जून रोजी झालेल्या पाकिस्तानविरुद्ध सामन्यात वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा विजय तिसरा गोलंदाज ठरला.