सचिन तेंडुलकर याच्यामुळे Maria Sharapova हिची Netizens ने मागितली माफी, जाणून घ्या नेमकं कारण

कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनात जेव्हा काही विदेशी सेलिब्रिटींनी या शेतकरी आंदोलनाला सोशल मीडियावर पाठिंबा दर्शवला तेव्हा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने त्या विरोधात एक ट्विट केले. सचिनच्या ट्विटवर केरळमधील शेतकरी नाराज झाले आहेत आणि त्यांनी ट्विटरवर रशियाची माजी टेनिस स्टार मारिया शारापोवाची माफी मागितली आहे. 

सचिन तेंडुलकर आणि मारिया शारापोवा (Photo Credit: Facebook)

Farmers Protest in India: देशातील शेतकरी तीन नवीन कृषी कायद्यांचा (Farm Law) निषेध करीत आहेत. जेव्हा काही विदेशी सेलिब्रिटींनी या शेतकरी आंदोलनाला सोशल मीडियावर पाठिंबा दर्शवला तेव्हा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) त्या विरोधात एक ट्विट केले. सचिनने लिहिले की आपल्या देशाला आपले प्रश्न कसे सोडवायचे हे माहित आहे आणि बाहेरील लोकांना देशाच्या अंतर्गत प्रकरणात रस घेण्याची आवश्यकता नाही. सचिनच्या ट्विटवर केरळमधील (Kerala) शेतकरी नाराज झाले आहेत आणि त्यांनी ट्विटरवर रशियाची माजी टेनिस स्टार मारिया शारापोवाची (Maria Sharapova) माफी मागितली आहे. 2015 मध्ये तिने आपल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, "सचिन मला माहित नाही." त्यानंतर भारतातील लोकांनी शारापोवाला ट्रोल केले होते. क्रिकेटच्या महान फलंदाजाबद्दल टेनिसच्या या नंबर 1 खेळाडूबद्दलचे विधान भारतीय चाहत्यांना पटले नाही आणि त्यानंतर स्टार टेनिसपटूला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला होता. (Farmers Protest: शेतकरी आंदोलनावर भाष्य करणाऱ्या परदेशींना सचिन तेंडूलकर यांच्याकडून चोख प्रत्युत्तर)

पण सचिनच्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या ट्विटमुळे दुखी झालेल्या केरळच्या लोकांनी आता शारापोवा प्रकरणात यू टर्न घेतला असून तिची माफी मागितली. बर्‍याच लोकांनी शारापोवाला केरळमध्ये येण्याचे आमंत्रणही दिले.

एका यूजरने मल्याळममध्ये लिहिले, "शारापोवा सचिनच्या बाबतीत तू बरोबर होतीस. तू त्याला ओळखावे अशी गुणवत्ता त्यांच्यात नाही."

शारापोवा त्या दिवशी बरोबर होती!

ती बरोबर आहे

बॉलिवूड आणि इतर क्रिकेट स्टार्सनी शेतकर्‍यांच्या नवीन कृषी कायद्याविरोधात निषेधाला पाठिंबा दर्शविण्याच्या विरोधात सरकारला घेराव केला. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्यावर ट्विटचा एक भाग म्हणून सचिननेभारताच्या ऐक्याचा संदेश पोस्ट केला होता. सचिनने लिहिले की, "भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. विदेशी ताकद प्रेक्षक होऊ शकतात पण सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारताला माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेतील. देश म्हणून संघटित होण्याची गरज आहे."

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now