Under 19 Asia Cup Final सामन्याचा 'मॅन ऑफ द मॅच' अथर्व अंकोलेकर याची विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेसाठी मुंबई संघात निवड
अंडर-19 वर्ल्ड कप मधील भारत विरुद्ध बांग्लादेश या अंतिम सामन्यात केवळ 28 धावा देत 5 विकेट घेणाऱ्या अथर्व अंकोलेकर याची आता मुंबई संघात देखील निवड झाली आहे. बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत अथर्वला खेळण्याची संधी मिळणार आहे.
अंडर-19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup) मधील भारत विरुद्ध बांग्लादेश (IND VS BAN) या अंतिम सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत सलग सातव्यांदा ही सिरीज जिंकण्याचा रेकॉर्ड कायम ठेवला. या सामन्यात अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत उत्सुकता ताणून होती मात्र अखेरीस पाच धावांच्या फरकाने टीम इंडियाने बांग्ला टायगर्सचा पराभव केला. या सामन्यात केवळ 28 धावा देत 5 विकेट घेतलेला मराठमोळा अथर्व अंकोलेकर (Atharva Ankolekar) 'मॅन ऑफ द मॅच' ठरला. हा विजय टीम इंडियाच्या सोबतच अथर्वच्या करिअरच्या दृष्टीने देखील बराच फायद्याचा ठरला. या सामन्यानंतर आता अथर्वची विजय हजारे (Vijay Hajare) या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या टीममध्ये सुद्धा निवड झाली आहे. त्यामुळे आता थेट मुंबई संघात सिनियर गटात खेळण्याची नामी अथर्वला मिळणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, यंदा हा सामना बंगळुरू येथे पार पडणार असून मुंबईच्या संघाचे नेतृत्व श्रेयस आयरकडे सोपवण्यात आले आहे. श्रेयसने यापूर्वी आयपीएलच्या वेळी दिल्ली च्या संघाच्या कर्णधाराची भूमिका बजावली होती. तर टीम मुंबईमध्ये एकूण 17 खेळाडूंची निवड झाली आहे., ज्यामध्ये अथर्व सोबतच सिद्धेश लाड ,आदित्य तरे, शार्दूल ठाकूर, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी या मराठी खेळाडूंचा देखील समावेश आहे.
दरम्यान, अथर्वचा आतापर्यंतचा प्रवास हा बराच खडतर होता, दहा वर्षांपूर्वी अथर्वच्या वडिलांचे निधन झाल्यावर आईने कंडक्टरची नोकरी सांभाळत अथर्व आणि त्याच्या भावाला मोठे केले. अथर्वचा भाऊ देखील आता अंडर 14 टीम मध्ये खेळत आहे. अशातच आता अथर्वला मिळालेल्या यशाने अंकोलेकर कुटुंबात आनंद पाहायला मिळत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)