IPL Official Partner 2020-22: UAE मध्ये होणार्या यंंदाच्या आयपीएल सह 2022 पर्यंत Unacademy असणार ऑफिशियल पार्टनर- BCCI
ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अन अॅकडमी (Unacademy) हा यंंदा आयपीएलसाठी पार्टनर असल्याचे सांंगण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार केवळ याच वर्षी नाही तर पुढील 3 सीझन म्हणजेच 2022 पर्यंत Unacademy हे आयपीएलचे पार्टनर असणार आहेत.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2020 ला 19 सप्टेंंबर पासुन युएई (UAE) मध्ये सुरुवात होणार आहे, त्यापुर्वी आज बीसीसीआय (BCCI) कडुन आयपीएलच्या ऑफिशियल पार्टनरची घोषणा करण्यात आली. ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अन अॅकडमी (Unacademy) हा यंंदा आयपीएलसाठी पार्टनर असल्याचे सांंगण्यात आले आहे.आयपीएलचे अध्यक्ष बृजेश पटेल, या बद्दल सांंगताना म्हणतात की, इंडियन प्रीमियर लीग 2020 चे ऑफिशियल पार्टनर' म्हणून आपण अनअॅकडमीला घेतल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. आयपीएल हा भारतातील सर्वाधिक पाहिला जाणारा क्रिकेट इव्हेंट आहे त्यामुळे भारतीय कंपनी Unacademy ला या प्लॅटफॉर्मचा प्रसार होण्यासाठी आयपीएलचा मोठा हातभार लागु शकतो असेही पटेल यांंनी म्हंंटले आहे. प्राप्त माहितीनुसार केवळ याच वर्षी नाही तर पुढील 3 सीझन म्हणजेच 2022 पर्यंत Unacademy हे आयपीएलचे पार्टनर असणार आहेत
IPL 2020: सुरेश रैना UAE वरुन भारतात परतला; वैयक्तिक कारणामुळे यंदाच्या आयपीएल सीजनला मुकणार
अनअॅकडमी ही बंगळुरु स्थित कंंपनी जगातील तज्ञ शिक्षकांना एकत्र आणून बहुभाषिक शिक्षणासाठी ऑनलाइन क्लास तयार करण्याच्या हेतुने काम करते. याचा अनेक स्पर्धा परिक्षांंसाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आयपीएल च्या माध्यमातुन हा प्लॅटफॉर्म अनेक गरजुंंपर्यंत पोहचेल, याची पोच वाढेल परिणामी शिक्षणाच्या कक्षा रुंंदावण्यास या भारतीय कंंपनीची मदत होईल असा विश्वास आणि आशा अनअॅकेडमी मार्केटिंंग प्रमुख करण श्रॉफ यांनी व्यक्त केला आहे.
ANI ट्विट
दरम्यान, आयपीएल सुरु होण्याआधीच BCCI ला मोठा धक्का बसला आहे. युएईत दाखल झालेल्या आयपीएलमधील एका संघाच्या 2 खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील 13 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असुन आता युएईमध्ये दाखल झालेल्या सर्व खेळाडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. 20 ते 28 ऑगस्ट दरम्यान एकूण 1 हजार 988 जणांची आरटी-पीसीआर कोविड19 चाचणी करण्यात आली आहे.अद्याप आयपीएलच्या ऑफिशियल वेळापत्रकाची माहिती समोर येणे बाकी आहे.